Viral Video : आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक मुलाला घडविण्यात आई वडिलांचा खूप मोलाचा वाटा असतो. त्यांच्या उपकाराची परतफेड आपण कधीही करू शकत नाही पण मुलगा किंवा मुलगी म्हणून आई वडिलांची सेवा आपण करू शकतो.
तुम्ही लहानपणी आई वडिलांची सेवा करणाऱ्या श्रावण बाळाची कथा ऐकली किंवा वाचली असेल. आई – वडिलांवर त्याची असीम श्रद्धा आणि आभाळाएवढं प्रेम होतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला सायकलवरून जाणाऱ्या आईवडिलांना त्रास होऊ नये सायकलला धक्का देत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला एक एक जोडपं सायकलवरून जाताना दिसेल आणि या जोडप्याचा मुलगा आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून या सायकलला धक्का मारताना दिसत आहे. आई वडिलांची सेवा करणाऱ्या या चिमुकल्याला पाहून तुमचेही डोळे भरून येईल. सायकल चालवताना वडिलांना जास्त त्रास होऊ नये म्हणून हा चिमुकला सायकलला मागून धक्का मारताना दिसतोय. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

bike thief shocking video viral
तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू

हेही वाचा : वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : चिमुकली हौशीने खातेय उंदीर ? बनवले उंदराच्या आकाराचे मोमोज, VIDEO पाहून तुम्हीही डोकं धराल

mpanktiya या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “असाच आयुष्यभर आई वडिलांची खंबीर साथ बनशील” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आई वडिलांना सहकार्य करणे, ही आपली ताकद आहे” तर एका युजरने लिहिलेय, ” याला म्हणतात भारतीय संस्कार” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून श्रावणबाळाची आठवण आली” हा व्हिडीओ अनेक युजर्सना आवडला असून अनेकांनी या चिमुकल्याचे कौतुक केले आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader