Viral Video : सोशल मीडियावर बहीण भावाचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात. कधी बहीण भाऊ मस्ती करताना दिसतात तर कधी हेच बहीण भाऊ भांडण करताना दिसतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे व्हिडीओ पाहून अनेकदा जुन्या आठवणी ताज्या होतात तर कधी कधी बहीण भावाची आठवण येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकला भाऊ ताईने काढलेली रांगोळी खराब करताना दिसतो पण पुढे जेव्हा बहि‍णीला माहिती पडते, तेव्हा काय घडते, हे तुम्हीच या व्हिडीओमध्ये पाहा. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (a boy spoiled the rangoli drawn by his sister caught in CCTV camera watch viral video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज दिसेल. या सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये एक मुलगा त्याच्याच घरासमोरची घरासमोरची रांगोळी खराब करताना दिसत आहे. त्यानंतर आजुबाजूला बघतो की कोणी बघत आहे का आणि नंतर पूर्ण रांगोळी पायाने मिटवताना दिसतो आणि त्यानंतर पळून जातो. पुढे व्हिडीओत बहीण त्याला चोप देताना दिसते तेव्हा हा चिमुकला वारंवार त्याच्या मोठ्या ताईला म्हणतो की “सॉरी दीदी मी परत नाही करणार” हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू येईल. काही लोकांना त्यांच्या लहान बहीण भावाची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : PHOTO: “मी उद्या उशीराच येणार…” कर्मचाऱ्यानं बॉसला मेसेज करत थेटच सांगितलं; चॅट वाचून नेटकरी म्हणाले “बरोबर केलं जशास तसं”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

pranjali__jadhav या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शे्र करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या वेळी सोडणार नाही” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चांगले कान पिळ परत नको करायला” तर एका युजरने लिहिलेय, “रांगोळी खराब करायची मज्जाच वेगळी असते” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी पण लहानपणी असताना समोरच्या काकूने काढलेली रांगोळी त्यांचे दरवाजे बंद करून नंतर अख्खी पुसून टाकायचो.” एक युजर लिहिते, “मी तर याला चांगला चोप दिला असता” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader