Viral Video : सोशल मीडियावर गडकिल्ल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक जण गडकिल्ल्यावरील फोटो किंवा व्हिडीओ आवडीने सोशल मीडियावर शेअर करतात. दरदिवशी हजारो लोक महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांना भेट देतात. काही लोक उंच गड किल्ले चढतात ज्याला आपण सोप्या भाषेत ट्रेकिंग म्हणतो. ट्रेकिंगदरम्यानचे तुम्ही आजवर अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कारण या व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्क नऊवारी नेसून गडकिल्ला चढताना दिसत आहे. या तरुणीला पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक तरुणी दिसेल. तिने गुलाबी रंगाची सुंदर नऊवारी नेसली आहे आणि ती अतिशय हिंमतीने नऊवारी नेसून गड चढताना दिसत आहे. पाठीवर बॅग, डोक्यावर हेल्मेट आणि पायात शूज घालून ती गड चढतेय. सुरक्षेसह ही मराठमोळी तरुणी गड चढताना दिसत आहे. गड चढताना तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओवर लिहिलेय, “पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआप बदलतील. मोरोशी भैरवगड” हा व्हायरल व्हिडीओ ठाणे जिल्ह्यातील भैरवगडचा आहे.
हेही वाचा : याला नशीब म्हणाल की आणखी काही? कामगारांवर कोसळल्या गोण्या पण तो एकटाच कसा वाचला? VIDEO चा शेवट एकदा पाहाच
पाहा व्हायरल व्हिडीओ
या तरुणीचे नाव नुपूर चोडंकर असून ती कोल्हापूरची आहे. nupur_chodankar या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पोरींचे खेळ बदला पोरी आपोआप बदलतील. प्रत्येक पोराने आपल्या बहिणीला असं तयार करा की कोणत्या पोराची तिच्याकडे वाईट नजरेने बघायची हिम्मत होणार नाही . तिला धाडशी बनवा , आपल्या जिजाऊंची हीच शिकवण आहे.जय शिवराय”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लाख व्हिडिओ बघितले पण हा व्हिडिओ लाखात एक बघितला.” तर एका युजरने लिहिलेय, “खरं आहे ताई. मुळात खेळात भेद नाही… लोकांनी जाणून बुजून हा खेळांमध्ये भेद केला आहे…. स्त्रियांच्या गुलामी साठी” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझी ताई खरी हिरकणी आहे ,नुपूर ताई ,जय जिजाऊ ताई” एक युजर लिहितो, “हि आमची दुर्गा , ही आमच्या स्वराज्याची हिरकणी” तर एक युजर लिहितो, “मराठा वाघीण”