Viral Video : सध्या पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे अनेक जण ट्रेकिंग, धबधब्याचा आनंद घेताना दिसत आहेत. पण धबधबा वा झरा किंवा नदी-तलावावर जाताना स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुली उंचावरून कोसळत्या झऱ्याच्या टोकावर अडकलेल्या दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येऊ शकतो.
हा व्हायरल व्हिडीओ एका निसर्गरम्य ठिकाणचा आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की, उंचावरून कोसळणाऱ्या झऱ्याच्या टोकावर दोन मुली एकमेकांना पकडून अडकलेल्या अवस्थेत आहेत आणि आजूबाजूचे लोक खूप जोरजोराने ओरडत आहेत. पण, शेवटी त्यांच्या आईने हिंमत दाखवली आणि दोन मुलींना वाचवण्यासाठी त्या कोसळत्या झऱ्याजवळ गेली. त्या माऊलीची हिंमत पाहून, त्यानंतर आजूबाजूचे लोकही मदतीला धावून आले आणि त्या दोन मुलींचा जीव वाचवला.
हेही वाचा : Panipuri Video : आता हे काय नवीन! कढी पाणीपुरी खाल्ली का? व्हिडीओ होतोय व्हायरल
हा व्हायरल व्हिडीओ इराण देशातील आहे. iran_shomal_village या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये झरा किंवा नदीच्या ठिकाणी जाताना लहान मुलांची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ पाहून युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी आईचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिलेय, ‘आई ही जगातील सर्वांत मोठी योद्धा आहे.’ तर एका युजरने लिहिलेय, ‘वेळेवर सर्वांनी मदत केली. देवाचे मनापासून आभार.’