Viral Video : सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडीओत नवरी भरलग्नात नवरदेवाच्या डोक्यावर पापडाचा चुरा करताना दिसत आहे. तुम्हाला वाटेल, हा काय प्रकार आहे, तर जाणून घ्या..
या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव एकमेकांसमोर बसलेले दिसतात आणि हे दोघेही लग्नातील एक विधी पार पाडताना दिसत आहे. हा एक प्रकारचा लग्नातील खेळ आहे. या खेळामध्ये नवरदेव आणि नवरी एकमेकांच्या डोक्यावर पापडाचा चुरा करायचा प्रयत्न करतात पण समोरच्याला आपल्या डोक्यावर पापडाचा चुरा करू द्यायचा नाही, ही या खेळातील महत्त्वाची बाब असते. जो पहिल्यांदा दुसऱ्याच्या डोक्यावर पापडाचा चुरा करतात, तो व्यक्ती हा खेळ जिंकतो.
या व्हिडीओत तुम्हाला नवरा नवरी एकमेकांच्या डोक्यावर पापडाचा चुरा करायचा प्रयत्न करताना दिसत आहे पण या दरम्यान नवरी हूशारीने नवरदेवाच्या हाततील पापड खाली पाडते आणि तेव्हा पापड उचलण्याच्या नादात नवरदेव खाली वाकतो आणि ती नवरदेवाच्या डोक्यावर पापडाचा चुरा करते. या व्हिडीओमध्ये कमेंट्री करतानाचा आवाज म्युझिक म्हणून वापरला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : “पहिल्यांदा मी बॅटींग करणार” दोन मित्रांमध्ये जुंपली, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण
हा व्हायरल व्हिडीओ sayo.photography या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका युजरने लिहिले, “नवरदेवाने ताकद वापरली पण नवरीने डोकं वापरलं” तर दुसऱ्या यूजरने लिहिले,”या दोघांची जोडी खूप छान आहे” अनेक युजर्सला या व्हिडीओचे म्युझिक खूप आवडले आहे.