Viral Video : उखाणा म्हणजे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे होय. कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी किंवा लग्नसमारंभात पत्नी आवडीने जोडीदाराचे नाव घेत उखाणा म्हणते. या उखाण्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषत: महाराष्ट्रीय लग्नामध्ये आवडीने उखाणे घेण्याची परंपरा आहे. हल्ली बदलत्या काळानुसार पती सुद्धा आवडीने पत्नीचे नाव घेत उखाणा म्हणताना दिसतात. लग्नाच्या वेळी विशेषत: नवरदेव नवरीला इतरांच्या आग्रहाखातर उखाणे घ्यावे लागते.
सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नातील गमती जमती, प्रथा- विधी, डान्स, गाणी, उखाण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी भन्नाट उखाणा घेताना दिसते. त्या नवरीचा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. (a bride said amazing ukhana in wedding tandul called rice in English watch viral video)
नवरीने घेतला भन्नाट उखाणा (Viral Video)
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरी उखाणा घेताना दिसते. नवरी भन्नाट उखाणा म्हणते, “तांदळाला इंग्रजीमध्ये म्हणतात राइस, रविराव माझी पहिली चॉइस” हा उखाणा सांगितल्यावर कॅमेरामॅन म्हणतो, “वाह वाह” हा उखाणा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “तुमची कोण आहे पहिली चॉइस”
हेही वाचा : VIDEO: टायरवर बसून भरत होता हवा, पण पुढच्याच क्षणी ‘असं’ काही झालं की माणूस हवेत उडून जमिनीवर आदळला
पाहा व्हायरल व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/C7_abDlIwM0/?igsh=aWtkeHh1aGRmcDdr
marathi_ukhane_insta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नवीन नवरीसाठी सुंदर मराठी उखाणे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी त्यांच्या जोडीदाराचे नाव घेत ते त्यांची पहिली चॉइस असल्याचे लिहिलेय. एका युजरने लिहिलेय, “यमुना जलावर पडली ताज महलाची सावली__ ची जन्म दाती धन्न ती माऊली” तर एका युजरने लिहिलेय, “मस्त ताई” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप नशीबवान मुलगा” एक युजर लिहितो, “माझा नवरा” तर एक युजर लिहितो, “एकनंबर मस्त उखाणा घेतला”