Viral Video : सध्या लग्नसमारंभ सुरू आहे. सोशल मीडियावर लग्न साखरपुड्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विविध विधींचे, डान्स गाण्याचे व्हिडीओ दरदिवशी चर्चेत येत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नवरी चक्क मजेशीर शपथ घेताना दिसत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नवरी नेमकी कोणती शपथ घेते? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओ एका साखरपुड्याच्या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरदेव नवरी, काही नातेवाईक स्टेजवर उभे असलेले दिसेल. नवरदेव आणि नवरीच्या मध्ये एक अँकर उभा आहे जो नवरीला शपथ घेण्यास सांगतो.
या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरी हात पुढे करून अँकरच्या सांगण्यावरून शपथ घेते.
नवरी अँकरच्या पाठोपाठ म्हणते, “लग्नानंतर माझं जर कधी चुकून भांडण झालं तर मी कधीच दर्शनला सॉरी म्हणणार नाही. दरवेळेस त्यांनाच सॉरी म्हणायला लावणार. लग्नानंतर दर्शन कितीही कामात असले तरी मी त्यांना पाणी पुरी खायला घेऊन जाणारच आणि ज्या वेळी मला शॉपिंगला जायचं असेल त्यावेळेस दर्शन झोपेतून उठायच्या आधी मी त्यांच्या खिशातून एटीएम कार्ड काढणार आणि दुपारी शॉपिंगला जाऊन येणार”

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : VIDEO : छोटी फुलवंती! दीड वर्षाच्या चिमुकलीने केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “प्राजक्ता माळी पेक्षा..”

नवरीची ही शपथ ऐकून स्टेजवर तिच्या शेजारी उभा असलेला नवरदेव व इतर नातेवाईक हसताना दिसतात. सध्या हा नवरीचा मजेशीर शपथविधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

sushilsuryawanshi05 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” साखरपुडा समारंभ.. ..इंगळे (सरदेशमुख)- महाकाळ परिवार, पुणे”

हेही वाचा : “काकूंना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले” ठाण्यात महिलांनी साडीमध्ये वाजवला रॉक बँड; VIDEO पाहून नेटकरीही थक्क

या अँकरचे नाव सुशील सूर्यवंशी असून ते सोशल मीडियावर अशा प्रकारचे भन्नाट व्हिडीओ शेअर करतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

Story img Loader