Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की नवरी नवरदेवाला वरमाला घालत असते तितक्यात तिच्यासमोर तिसरी व्यक्ती येते आणि पुढे जे काही होते ते पाहून कोणीही अवाक् होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

नवरी नवरदेवाला वरमाला घालणार तितक्यात तिसरी व्यक्ती मध्येच आली अन्…

लग्न हे पवित्र बंधन असते. लग्नानंतर दोन व्यक्ती एका नव्या आयुष्याची सुरूवात करतात. लग्न सोहळ्यात वरमाला प्रथेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच प्रथेदरम्यान एक अशी घटना घडली जे पाहून कोणालाही धक्का बसेल. तुम्ही कधी असे पाहिले का की नवरीने वरमाला नवरदेवाच्या गळ्यात नाही तर चुकून तिसऱ्या व्यक्तीच्या गळ्यात टाकली. हो, असं घडले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेन की नवरदेव आणि नवरी एकमेकांना वरमाला घालताना दिसतात. सुरूवातीला नवरदेव नवरीला वरमाला घालतो आणि त्यानंतर नवरी नवरदेवाला वरमाला घालायला पुढे येते पण तितक्यात नवरदेवासमोर एक दुसरा तरुण येतो आणि नवरीच्या हातची वरमाला चुकून त्याच्या गळ्यात पडते. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरणार नाही तर काही लोक अवाक् होतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : वृद्ध आई वडिलांना फक्त तुमचा वेळ हवा असतो! “मला काहीही नको फक्त तू पाहिजे” आजोबा लेकीचा संवाद व्हायरल, पाहा ह्रदयस्पर्शी VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : पुलावर बंद पडली रेल्वे, दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी धोक्यात घातला जीव, Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

hasleyoriginals या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “येथे वाइल्ड कार्ड एन्ट्री” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

यापूर्वीही सोशल मीडियावर लग्नातील मजेदार घटनांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ चर्चेत आला होता. वरमाला घालण्यासाठी नवरदेवाने नवरीच्या अंगावर उडी मारली होती आणि त्यामुळे नवरी धाडकन खाली पडली होती. हा व्हिडीओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता.