अनेक लोकांना प्रवास करताना खिडकीशेजारी बसायला आवडतं, कारण प्रवास करताना बाहेरील दृश्याचा आनंद घेण्यासाठी ते खिडकीशेजारी बसण्याला प्राधान्य देतात. त्यात जर विमानातून प्रवास करायचा असेल तर लोक जास्तीचे पैसे देतात पण विंडो सीट घेणं पसंत करतात. मात्र, नुकतंच एका प्रवाशासोबत असा काही किस्सा घडला आहे जो ऐकून तुम्हाला हसू आवरणं कठिण होणार आहे. हो कारण एका प्रवाशाने विंडो सीटशेजारी बसण्यासाठी जास्तीचे पैसे देऊन तिकीट काढूनही, या प्रवाशाला खिडकी नसलेली विंडो सीट मिळाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती प्रवाशानेच ट्विटद्वारे दिली आहे.

प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये, असं प्रवाशांना वाटतं, यासाठी ते जास्त पैसे खर्च करतात, पण जास्त पैसे खर्च करूनही निकृष्ट सेवा मिळाली तर अनेकांची चिडचिड होते. ब्रिटीश एअरवेजच्या एका प्रवाशासोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. या प्रवाशाने विंडो सीटसाठी जास्त पैसे दिले, पण त्याला खिडकी नसलेली सीट मिळाल्यामुळे तो नाराज झाला.

हेही वाचा- एका रात्रीत एक दोन नव्हे तब्बल ६ हजार २४३ कोटींचा बनला मालक, निमित्त ठरली ‘ही’ एक गोष्ट

नेमकं घडलं काय ?

एका प्रवाशाने ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून प्रवास केला आणि विंडो सीटसाठी अधिकचे पैसेही दिले पण तो त्याच्या सीटवर पोहोचला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. कारण या प्रवाशाला जी सीट मिळाली तिथे खिडकी नव्हतीच. त्यामुळे विंडो सीट शेजारी बसण्यासाठी तिकीट काढलं आणि सीटजवळ विंडोच नसल्याने तो प्रचंड नाराज झाला. या प्रवाशाचे नाव अनिरुद्ध मित्तल असं आहे. त्यांने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली शिवाय यावेळी त्याने फ्लाइट सीटचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सीटशेजारी खिडकी नसल्याचं दिसत आहे.

हेही वाचा- “माझी काडीपेटी परत करा अन्यथा…” वीज विभागाच्या कार्यालयात डेंजर वाद; Viral पत्र पाहून पोट धरुन हसाल

अनिरुद्धने ट्विटमध्ये लिहिले की, “मी उजव्या बाजूच्या विंडो सीटसाठी जास्तीचे पैसे दिले, कारण हिथ्रोवर उतरताना मला सुंदर दृष्य पाहायचे होते.” तसंच त्याने यावेळी ब्रिटिश एअरवेजला टॅग करत “माझी विंडो कुठे आहे?” या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या प्रवाशाच्या ट्विटवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी एअरलाइनने प्रवाशाची निश्चितपणे फसवणूक केल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने लिहिलं आहे की, ब्रिटीशांची चोरी करण्याची जुनी सवय आहे.”

Story img Loader