मुलाचे नाव हे त्याची ओळख असते. ते आयुष्यभर सोबत असते. नाव कर्णमधूर आणि चांगले ठेवण्याचा आई वडिलांचा प्रयत्न असतो. मात्र नामकरणात एरवी लवचिकता येत असल्याचे काही वृत्तातून समोर येत आहे. युकेमध्ये एका ब्रिटिश माता पित्यांनी आपल्या मुलाला असे नाव दिले आहे जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका भारतीय खाद्य पदार्थाचे नाव त्यांनी आपल्या मुलाला दिले आहे. मुलाला दिलेले हे नाव लोकांच्या पसंतीस तर पडतच आहे, त्याचबरोबर नाव ऐकून सर्वांना हशा पिकत आहे.
मुलाला दिले हे नाव
राशी आणि हल्ली चालणारे नाव आई वडील आपल्या बाळांना देतात. मात्र, एका ब्रिटिश कुटुंबाने आपल्या बाळाला पकोडा हे नाव दिले आहे. हे नाव समाज माध्यमांवर खूप पसंत केले जात आहे. आयरलँड येथील न्यूटाऊनअबेमध्ये कॅप्टन्स टेबल नावाचे एक प्रसिद्ध रेस्टॉरेंट आहे. या रेस्टॉरेंटकडून सोशल मीडियावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या रेस्टॉरेंटमध्ये अनेकदा येणाऱ्या एका जोडप्याने आपल्या नवजात बाळाला रेस्टॉरेंटमधील एका खाद्य पदार्थाचे नाव दिले आहे. त्यांनी पकोडा असे नाव दिले, अशी माहिती त्यांनी फेसबूकवर दिली आहे.
(Viral : प्लॅटफॉर्मवरून खाली पडलेल्या प्रवाशावरून गेली ट्रेन, पाहा धडकी भरवणारा हा व्हिडिओ)
बिल केले शेअर
रेस्टॉरेंटने या गोंडस बाळाचा फोटो देखील शेअर केला आहे. त्याचबरोबर पकोडा तुझे या जगात स्वागत आहे. आम्ही तुला भेटण्यासाठी वाट पाहू शकत नाही, अशी प्रतिक्रिया देखील रेस्टॉरेंटकडून लिहिण्यात आली आहे. बाळाच्या फोटोबरोबरच त्यांच्याकडून एक बिल देखील शेअर करण्यात आले आहे. यामध्ये बाळाला दिलेल्या नावाचा, म्हणजेच त्या खाद्यपदार्थाच्या नावाचा उल्लेख आहे.
अनेकांनी केले अभिनंदन तर काहींनी..
या गोंडस बाळाला दिलेल्या नावाचे काही नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. तर काहींनी यास हसण्यावारी नेले आहे. काहींनी यावर विनोद देखील केला. पोस्टला समिश्र प्रतिसाद मिळाला आहे. जसे एकाना फार मजेदार विनोद केला आहे. एकने दोन मुलींचा फोटो शेअर करत ‘धीस इज माय टू टिन्स – चिकन अँड टिक्का’ असे कमेंट केले आहे. हा विनोद सर्वांना हसवत आहे. दुसऱ्याने आपल्या मुलाचा फोटो शेअर करत त्याचे नाव चिकन बॉल असल्याचे म्हटले आहे.
(Viral : हाताचे पंजे नसतानाही चिमुकला काढतोय अप्रतिम पेंटिंग, पाहा हा प्रेरणादायी व्हिडिओ)