Viral Video : बहीण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी असते. बहीण भाऊ हे एकमेकांबरोबर भांडतात पण न बोलका एकमेकांशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. एकमेकांची मजा घेणारे, एकमेकांबरोबर मस्ती करणारे हे बहीण भाऊ अनेकदा एकमेकांसाठी इतरांशी लढताना सुद्धा दिसतात. सोशल मीडियावर या बहीण भावांचे कधी कधी मजेशीर तर कधी भावुक करणारे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक भाऊ त्याच्या बहिणीची मजा घेताना दिसतात. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की भाऊ हातात झुरळ पकडून बहिणीला भीती दाखवताना दिसत आहे. (a brother Holding a cockroach in his hand showed fear to his sister funny video of brother sister relation goes viral)
झुरळ हातात पकडून बहिणीला दाखवली भीती
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक भाऊ हातात झुरळ पकडून बहिणीला भीता दाखवत आहे. झुरळ हातात पकडून तिच्या जवळ जाताना दिसत आहे. बहीण मात्र भीतीपोटी हातात उशी घेऊन बेडवर फिरताना दिसत आहे. झुरळाच्या भीतीमुळे ती रडताना सुद्धा दिसत आहे भाऊ मात्र तिला रडताना पाहून हसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांचे बालपण आठवेल तर काही लोकांना त्यांच्या बहीण भावाची आठवण येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “आज आई बाबा घरी नाही मग आज बहिणीला दाखवतो…”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
insta_aahana_thakur_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बहीण भावाला चिडवतात पण आणि नंतर रडवतात सुद्धा” तर एका युजरने लिहिलेय, “माझा भाऊ सुद्धा असाच करतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “असू दे भावा.. वडिलांना नाव सांगेन तुझं” एक युजर लिहितो, “मस्त आयडिया आहे ही”