Viral Video : बहिण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असते. बहिण भाऊ कितीही भांडले तरी एकमेकांशिवाय राहू शकत नाही. एका भावासाठी सर्वात भावूक क्षण असतो जेव्हा त्याची बहिण सासरी जाते. त्यावेळी नेहमी भांडणारा भाऊ ढसा ढसा रडताना दिसतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भाऊ त्याच्या भाऊजीच्या पाया पडून बहिणीला खूश ठेवण्यासाठी विनवणी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. काही लोकांना अश्रु आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
बहिणीवर जीव तोडून प्रेम करणारा भाऊ ढसा ढसा रडला
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक विवाहित जोडपे दिसेल ज्यांचे नुकतेच लग्न झाले. ते बसलेले आहे. तेव्हा नवरीचा भाऊ तिथे येतो आणि ताई आणि भाऊजीच्या पाया पडतो आणि अचानक ढसा ढसा रडताना दिसतो. भाऊजीच्या पायावर डोकं ठेवून बहिणीला नेहमी आनंदी ठेवण्याची विनवणी करतो. त्याला रडताना पाहून बहिण सुद्धा भावुक होते. हा व्हिडीओ पाहून घरातील सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. नवरदेव त्याला रडू नको अशी विनंती करत मिठी मारतो पण भावुक झालेल्या भावाच्या डोळ्यातील अश्रु थांबत नाही. त्यानंतर तो बहिणीच्या पाया पडतो आणि दोघेही भाऊ ढसा ढसा रडतात. तेव्हा तिथे जमलेले नातेवाईक आणि घरातील लोक त्याला बाजूला करतात. हा व्हिडीओ पाहून कोणालाही रडू येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
kunalbiswass या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दीदी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तो खरोखर त्याच्या बहिणीच्या आनंदासाठी भीक मागत होता” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून मला रडायला आले” आणखी एका युजरने लिहिलेय, “बहिण खूप नशीबवान आहे” एक युजर लिहितो, “मला बहिण नाही पण तरी मला व्हिडीओ पाहून रडायला आले. देवाने सर्व दिले फक्त एक बहिण दिली नाही” तर एक युजर लिहितो, “फक्त एक भाऊच हे दु:ख समजू शकतो”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या बहिण भावाची आठवण आली.