माणूस आणि प्राण्यांचं हे नातं अनेक वर्षांपासून आपण पाहत आलोय. माणसं जेवढी प्राण्यांची काळजी घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात. त्यापेक्षाही प्राणी माणसांना जास्त जीव लावतात. मुक्या जनावरांच्या या भावना ते नेहमीच त्यांच्या कृतीतून वेळोवेळी व्यक्त करीत असतात.
जंगलतोडीमुळे मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा वावर आता अगदी सामान्य झाला आहे. अनेक ठिकाणी प्राण्यांकडून काम करून घेतलं जातं आणि त्याचा त्यांना त्रास सहन करावा लागतो. आजकाल गैरसोय, गैरवर्तणूक किंवा अन्य गोष्टींमुळे काही प्राणी धोकादायक ठरू लागले आहेत. ते कधीही, कुठेही येऊन कोणावरही हल्ला करू लागले आहेत. प्राणी खवळले, तर ते कोणालाही ऐकत नाहीत. सध्या असाच काहीसा प्रकार एका वयोवृद्धाबरोबर घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका बैलाने चक्क स्कूटर चालवणाऱ्या माणसालाच धडक दिली आणि तो ट्रकखाली आला. पुढे नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या.
हेही वाचा… परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
व्हायरल व्हिडीओ
एक महिला बैलाला घेऊन रस्त्यावरून आपल्या वाटेने जात असते तितक्यात अचानक बैल पिसाळतो आणि समोरून येणाऱ्या स्कूटर चालकावर हल्ला करतो आणि तिथून जोरात पळून जातो. स्कूटर चालकावर हल्ला केल्यानंतर स्कूटर चालक समोरून येणाऱ्या ट्रकच्या खाली जातो. पण इतक सगळं होऊनही स्कूटर चालकाच्या जीवावरचा धोका टळतो. ट्रकखाली येताच ट्रकचालक ब्रेक मारवून आपली गाडी थांबवतो आणि स्कूटर चालकाचे प्राण वाचवतो. हा हल्ला अगदी काही सेंकदात होतो. पण चतुराईने आणि क्षणार्धात घेतलेल्या ट्रकचालकाच्या निर्णयामुळे स्कूटर चालकाचे प्राण वाचतात.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @bangalore_premium या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “महालक्ष्मी लेआऊट बंगळुरू येथे ही घटना घडली” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर या व्हिडीओला तब्बल ४.३ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच सगळ्यांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ट्रक चालक जबाबदारीने परिस्थिती हाताळली” तर दुसऱ्याने स्कूटर लाल रंगाची होती म्हणून बैलाने हल्ला केला असावा अशी कमेंट केली. एकाने कमेंट करत लिहिलं, “लपलेलं सत्य.. ट्रकच्या जोरात वाजणाऱ्या हॉर्नमुळे त्या बैलाने उडी मारली”