गेल्या काही वर्षांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होणार आहे. सोशल मीडियावर अपघातांच्या व्हिडीओ सर्रास व्हायरल होत असतात. दरम्यान उत्तराखंडमध्ये रविवारी भरधाव वेगाने धावणारी एक बस पुलावरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये डझनहून अधिक प्रवासी जखमी झाले, त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.”अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. दरम्यान या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा –मित्रांच्या डोळ्यासमोर धरणात वाहून गेला ३२ वर्षीय तरुण! थरारक घटनेचा Video Viral
उत्तराखंडच्या हरिद्वार शहरातील हर की पौरीजवळ हा अपघात झाला. पुलावरून बस खाली कोसळ्याने २४ हून अधिक प्रवासी जखमी झाले, चार जण गंभीर आहेत. ही घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओ@SachinGuptaUP नावाच्या खात्यावरून व्हिडीओ पोस्ट केला आहे. बस पुलावरून दीनदयाळ पार्किंगमधील कारवर कोसळली. अनेक प्रवासी जखमी झाले. बसमधून काही प्रवासी बाहेर येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. लहान मुलेही बसमध्ये अडकल्याचे दिसत आहे. कोणीतरी ओरडून लहान मुलांना वाचवण्यास सांगत आहे. अपघाताच्या ठिकाणी बघ्याची गर्दी झाली आहे. काय चाललंय या देशात? कुठे रस्ते वाहत आहेत, कुठे पूल कोसळत आहेत, कुठे कागदपत्रे फुटत आहेत, तर कुठे अख्खी बस खाली पडते आहे, मोदीजी, चांगला ज्योतिषी दाखवा, हा विकास फोफावतोय ना?
उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (UPSRTC) बसमधील जखमी प्रवाशांना हरिद्वार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती रोडी बेलवाला पोलीस चौकीचे प्रभारी यशवीर सिंग यांनी दिली. यूपीएसआरटीसीच्या मुरादाबाद डेपोची बस दीनदयाळ पार्किंग क्षेत्रावरील पुलावरून पडली आणि पार्किंगच्या काही गाड्यांचेही नुकसान झाले. अपघाताचे कारण काय होते याचा शोध सुरु आहे.