Viral Video : सोशल मीडियावर रस्त्यावरील स्टंट किंवा अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे अपघात अनेकदा अनवधानाने होतात पण सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका कॅब ड्रायव्हरने जाणूनबुजून एका बाइकला ठोकले. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला दिसेल की रस्त्यावर कॅब ड्रायव्हर आणि बाइक चालवणारा व्यक्ती एकमेकांशी वाद घालत आहेत. पुढे हा कॅब ड्रायव्हर रागाच्या भरात चक्क बाइकला जाणूनबुजून धडक मारताना दिसत आहे. त्यानंतर बाइक चालवणारी व्यक्ती स्वत:ला कसाबशी सावरते आणि आपली बाइक रस्त्याच्या कडेला लावते. तितक्यात कॅब ड्रायव्हर कारमधून बाहेर येतो आणि दोघे एकमेकांबरोबर पुन्हा वाद घालतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चेन्नईचा असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : Pune Viral Video : सोन्याची सकाळ! दगडूशेठ हलवाई गणपतीला नमस्कार करताना बस ड्रायव्हरचा व्हिडीओ व्हायरल

@hness_sheik या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून युजर्स हा व्हिडीओ पाहून संतापले आहे. या व्हिडीओमध्ये युजर्सनी कॅब ड्रायव्हरविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एका युजरने चेन्नई पोलीस आणि चेन्नई ट्रॅफिक पोलिसांना टॅग करत कॅब ड्रायव्हरविरोधात मोठी कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका युजरने लिहिले आहे, “कलम ३०७, खुनाचा प्रयत्न करणे अंतर्गत कॅब ड्रायव्हरला शिक्षा झाली पाहिजे.”