सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्या अंगावर शहारा आणणारे. तर काही व्हिडीओ असे असतात, ज्यातून आपणाला काही शिकायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं म्हणत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही लोकांनी कॅनोलमध्ये वाहत जाणाऱ्या वासराला जीवदान दिल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हिडीओत एका कॅनोलमध्ये पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात एक वासरु वाहून जाताना दिसत आहे. यावेळी व्हिडीओत पाण्याचा प्रवाह खूप वेगवान असल्याचं दिसत आहे. त्यामुळे काही वेळातच वाहत जाणारं वासरु पाण्यात बुडणार असं वाटतं आहे. मात्र, कॅनोलच्या कडेला उपस्थित असलेल्या एका जेसीबी चालकाच्या प्रसांगवधानामुळे या वासराला जीवदान मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण वाहत जाणाऱ्या वासराला जेसीबी चालक अतिशय हुशारीने पाण्याबाहेर काढतो. वासराला सुखरुप वाचवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओतील जेसीबी चालकाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. तर नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही पाहा- “वेळेचा सदुपयोग…” भर पावसात तरुणांनी बाईकवर केली अंघोळ, अंगाला साबण लावतानाचा Video पाहून नेटकरी म्हणाले…

WallStreetSilv नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ६ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ८० हजार लोकांनी तो लाईक केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना नेटकऱ्यांनी लिलिहं आहे की, “जेसीबी ड्रायव्हरचे मनापासून धन्यवाद.” एका नेटकऱ्याने हे खूप सुंदर काम असल्याचं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर माणुसकी अद्याप जिवंत असल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader