Viral Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही रस्ते अपघात इतके भयानक असतात की अंगावर काटा येतो. सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दररोज सोशल मीडियावर एक दोन रस्ते अपघाताचे व्हिडीओ समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका भरधाव कारने एका सायकलस्वार तरुणाला आणि दुचाकीचालकाला जोरदार धडक दिलेली दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक रस्ता दिसेल. या रस्त्यावरून एक तरुण सायकल चालवताना दिसेल. त्याच्यामागे एक व्यक्ती दुचाकी चालवताना दिसत आहे. अचानक त्यांच्यासमोर विरुद्ध दिशेने भरधाव कार येते आणि त्यांना जोरदार धडक देते. या घटनेत सायकलस्वार आणि दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू होतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ लखनऊ येथील असून संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. सध्या हा अपघाताचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Siraj Noorani या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लखनऊ येथे भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू. या रस्ते अपघाताचा सीसीटिव्ही समोर आला आहे. कारने सायकल चालवणाऱ्या तरुणाला आणि दुचाकी चालकाला जागेवरच चिरडले. पोलीस कार चालकाचा शोध घेत आहे. हा व्हिडीओ मेट्रोपॉलिटन पोलीस स्टेशनजवळील आहे.”

हेही वाचा : VIDEO : बापरे! भेंडी समोसा; तुम्ही कधी खाल्ला का? व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहन हळू चालवावे” तर एका युजरने लिहिलेय, “कारचालक बुलडोझर चालकाप्रमाणे चालवत होता” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी कार चालकावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे