लहान मुलं खूप अवखळ असतात म्हणूनच त्यांच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. नजर हटेपर्यंत ही डोळ्यासमोरून गायब होतात. आपल्या आसपास लहान मुलं असतील तर खूप सावध रहावे लागते. मुलांवर लक्ष ठेवावे लागते. पालकांना मुलांचा जीव धोक्यात पडू नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते पण एक क्षण मुलांकडे दुर्लक्ष करणे त्यांच्या जीव धोक्यात टाकू शकते. अनेकदा सोशल मीडियावर अशा अनेक घटनांचे व्हिडिओ समोर येत असतात. मुलं हात सोडून लिफ्टमध्ये एकटे जातात किंवा खेळताना अचानक कारच्या समोर येतात. सध्या असाच काहीशा घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला रस्त्यावर एकटाच खेळत आहे, त्याचे पालक आसापास दिसत नाही. काही वेळाने एक व्यक्ती तिथे येते आणि रस्त्यावर पार्क केलेली कार काढून तेथून जाण्याचा प्रयत्न करते. पण कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला खाली बसलेला चिमुकला दिसत आणि कार चिमुकल्याच्या अंगावरून चढवली जाते. कारची चाक चिमुकल्याच्या अंगावरून जाते तरी कारचालकाच्या लक्षात येत नाही, तो तेथून थेट निघून जातो पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे चिमुकला कार अंगावरून जाऊनही पुन्हा उठून उभा राहतो. चिमुकला वेदनेमुळे रडत असल्याचे दिसते जे पाहून काही चिमुकले त्याच्या जवळ येतात. त्यानंतर ते चिमुकले पळत घराकडे निघून जातात.
हेही वाचा – Video : चूक कोणाची? प्रशासनाची की बेशिस्त प्रवाशांची? जीव धोक्यात टाकून रेल्वेत चढ-उतर
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहीला आहे. अनेकांनी व्हिडिओ पाहून कार चालकावर रोष व्यक्त केला.
हेही वाचा – कौतुकास्तद! ८२ वर्षांच्या आजोबांनी झाडला रस्ता! नेटकऱ्यांनी केले तोंडभरून कौतुक, Viral Video बघाच
इंस्टाग्रामवर pro_capitalmotivation07वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “देव तारी त्याला कोण मारी..” व्हिडिओ नक्की कुठला आहे याबाबत माहिती दिलेली नाही.
व्हिडिओवर कमेंट करून अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. एकाने कमेंट केली की, “तो गरीब मुला आहे पण त्यालाही अधिकार आहे. गरीब आहे. म्हणून काय झालं, गाडीवाल्यावर कारवाई झाली पाहिजे.”
दुसरा म्हणाला की, “देवाने त्याला तारल पण समोर असून त्याला नाही दिसलं का? पुढे जाऊन पण थांबला नाही”
तिसरा म्हणाला, कार नंबर घेऊन कारवाई झाली पाहिजे, गरीबाबरोबर असे का झालं?