Viral Video : आईचा मार कुणालाच चुकला नाही! मांजरीच्या पिल्लालाही बसला आईच्या हातचा फटका, video पाहून तुम्हालाही लहानपण आठवणार!
असं म्हणतात की परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता आले नाही म्हणून त्याने प्रत्येकाला आई दिली. आई ही आई असते. ती नेहमी तिच्या मुलांची काळजी घेते आणि त्यांच्यावर खूप प्रेम करते. प्राण्यांमध्येही आईचा–लेकरांचा जिव्हाळा दिसून येतो. अशाच एका मांजर आणि तिच्या पिल्लाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : “पापा की परी नाले में गिर पडी”; स्कुटी घेऊन मुली चक्क पडल्या नाल्यात, Video एकदा पाहाच…
या व्हिडीओमध्ये ती आपल्या पिल्लाला शोधताना दिसत आहे तर दुसरीकडे मांजरीचे पिल्लू एका भिंतीशेजारी लपून बसलेले व्हिडीओमध्ये दिसत आहे. पुढे मांजरीला तिचे पिल्लू दिसते आणि ती पिल्लावर रागावते. पुढे व्हिडीओमध्ये ती पिल्लाला फटकाही देताना दिसते. आणि तोंडात पकडून घेऊन आपल्याबरोबर घेऊन जाते. सध्या हा माय-लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
@ShubhangiUmaria या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आपलं मूल न सांगता घराबाहेर गेल्यावर ओरडून, एक लाफा लगावून, खेचून परत घरात घेऊन जाणारी ती आईच… प्रत्येक आई सारखीच असते..”
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ पाहून अनेक युजर्संना आपले बालपण आठवले आहे. एका युजरनी लिहिले आहे, “आम्हाला असे फटके न मोजता मिळायचे… शिवाय रडायला लागलं की आवाज बंद कर नाही तर अजून मारेन! अशी धमकी मिळायची.” तर आणखी एका युजरनी लिहिले, “आई ही आई असते.”