सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच प्राण्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात. काही व्हिडीओ इतके मनोरंजक असतात की आपल्याला ते पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशाच एका पाळीव मांजरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक पत्रकार लाइव्ह टीव्हीवर देश आणि जगाच्या मुद्द्यावर गंभीरपणे बोलत असताना मागून एक मांजर येऊन त्याच्या कानाखाली मारते. व्हिडीओ खूपच मजेदार आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आपले हसू आवरणे कठीण जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, तुर्कीचे क्रीडा विश्लेषक हुसैन ओझकोक एका लाइव्ह कार्यक्रमात बसलेले दिसत आहेत. अँकर त्यांच्याशी कुठल्यातरी मुद्द्यावर बोलत असते. यावेळी ते अँकरला उत्तर देत असताना अचानक मांजर मागून येते. सुरुवातीला ती त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला बसते आणि नंतर संभाषणादरम्यानच त्यांना एक थप्पड मारते. या प्रसंगावर शोच्या अँकरलाही हसू आवरता आले नाही. यावेळी हुसैन स्वतः हसले.
नाऊ दिस न्यूज (nowthisnews) च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये, तो जगभरात सुमारे १ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे आणि ६० हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. लोकांनी तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ जगभरात चर्चेचा विषय बनला आहे.