जगात सर्वांनाच प्रेम हवं असतं. देव, दानव व मानवच नव्हे तर वनात वावरणारे प्राणी व आकाशी झेप घेणारे पक्षी सुद्धा प्रेमासाठीच आतुर असतात. प्रेम प्राप्त करणे ही मानव मनाची सदासर्वदा एकमेव इच्छा असते. अगदी माणसाप्रमाणेच प्राणी-पक्षी सुद्धा आपल्या प्रेमाला गमावण्याची भावना सहन करता येत नाही. आम्ही जे तुम्हाला सांगतोय यावर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. कारण याचाच पुरावा देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की, कधी कधी प्राणी आणि पक्षी माणसांपेक्षा जास्त समजूतदारपणा दाखवतात. यामध्ये एक कोंबडा आपल्या कोंबडीला वाचवण्यासाठी काय करतो, हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कोंबडा आपल्या कोंबडीला वाचवण्यासाठी तिला घेऊन जाणाऱ्या माणसासोबतच भिडलेला दिसून येतोय. दरम्यान, तो आपल्या कोंबडीला वाचवण्यासाठी असं काही करतो की ते पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या विस्मयकारक व्हिडीओमध्ये आपण पाहू शकाल की, कोंबडा त्याच्या कोंबडीला बंदिवासातून मुक्त करण्यात यशस्वी होतो. हा व्हिडीओ पाहून लोक कोंबडीची समज आणि कोंबडीसाठी असलेलं कोंबड्याच्या प्रेमाचं कौतुक करत आहेत.

या व्हिडीओची सुरुवात एका हॉलपासून होते. सुरूवातीला हे कोंबडा आणि कोंबडी एकत्र फिरत असतात. त्यानंतर थोड्या वेळाने एक व्यक्ती तिथे येतो आणि कोंबडी उचलतो. हा व्यक्ती कोंबडीला सोबत घेऊन जाऊ लागतो. हे पाहून कोंबडा मात्र त्या व्यक्तीवर चिडतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोंबडा थेट या माणसासोबत भिडतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. कोंबडा आपल्या चोचीने माणसावर वारंवार हल्ला करतो. पण कोंबड्याचा हा स्ट्राइक पुरेसा ठरत नाही आणि तो आपल्या कोंबडीला घेऊन जाणाऱ्या माणसाला रोखण्यात अपयशी ठरतो. तुम्हाला विश्वास नाही होणार पण हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच….

पुढे जे होतं ते पाहून तुम्ही आश्चर्य व्हाल…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोंबडीला एका छोट्या घरात बंद करून ती व्यक्ती निघून जाते. इथे कोंबडा एक शक्कल लढवतो आणि घराच्या वर चढतो. आपल्या चोचीने तो घराचं दार उघडतो. त्यामुळे त्याची कोंबडी बंद घराबाहेर पडते.

आणखी वाचा : पार्कमध्ये मुस्लिम महिलांनी आणि लहान मुलांच्या घसरगुंडीवर उभं राहून वृद्धानं केलं अजान पठण; या VIRAL VIDEO मध्ये नक्की आहे काय ?

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चक्क दारूची बॉटल घेऊन वरातीत मुलीचा भन्नाट डान्स; VIRAL VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत त्याने ‘जब चीज बिघड जाए, तुम देना साथ मेरा’ असा खास संदेश लिहिला आहे. या व्हिडीओमधील कोंबड्याचं हे प्रेम पाहून सारेच जण भावूक होताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांना खूपच भावलाय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करत कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “प्रेम असावं तर असं…!!!”.

Story img Loader