मगर एक शक्तिशाली उभयचर प्राणी आहे. पाण्यात तर मगरीची शक्ती दुप्पटीने वाढते. त्यामुळे पाण्यात मगरीशी वैर नको, अशी म्हण प्रचलित आहे. शिवाय मगरीच्या तावडीत एखादं भक्ष्य सापडलं की, वाचणं कठीण असतं. त्यामुळे कितीही मोठा प्राणी असला तरी मगरीच्या तावडीत सापडला की तो जिवंत परत येणं अशक्य असतं. आजकाल मगरींशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही धक्कादायक आपल्या अंगावर काटा आणणारे असतात, तर काही मजेशीर असतात. सध्या असाच मगरींशी संबंधित एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मगरीच्या कळपात अडकलेली एक कोंबडी मृत्यूच्या दाढेतून सुखरुप वाचल्याचं दिसत आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला एक कोंबडी एक-दोन नव्हे, तर असंख्य मगरींच्या कळपात अडकलेली दिसत आहे. या दरम्यान काही मगरी जमिनीवर तर काही पाण्यात फिरताना दिसत आहेत. यावेळी सर्व मगरींची नजर तिथे उडत आलेल्या कोंबडीवर पडते, त्यामुळे कोंबडीची शिकार करण्यासाठी हल्ला करताना दिसतात. पण कोंबडी अतिशय चपळाईने सगळ्या मगरींना चकवा देत त्यांच्या तावडीतून सुखरुप बाहेर पडते. हा व्हिडीओ अत्यंत थरारक असून तो सुरुवातीला पाहताना मगरी कोंबडीला खाऊन टाकणार असंच वाटतं, मात्र, काही वेळाने कोंबडी सुखरुपपणे निघून जाते. जे पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होत आहे.
पाहा व्हिडीओ –
ट्विटरवर शेअर करण्यात आलेला अवघ्या १० सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय तो आतापर्यंत ५ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर ५९ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओ लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे, “यमराज रजेवर असताना असे होते.” दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे, “यालाच जीवन म्हणतात.”