Viral Video : आई हे प्रत्येकाच्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे जिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिची जागा आपल्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे आईला ईश्वराचे दुसरे रूप मानले जाते. आई ही नेहमी तिच्या बाळाच्या सुखाचा विचार करते, मुलांना त्रास होऊ नये, सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे व्हावे, म्हणून ती नेहमी झटत असते. एका मुलासाठी आई हे सर्वकाही असते. आई मुलांचे नाते हे जगावेगळे आहे. या नात्यात एकमेकांविषयी प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. जसं आई मुलाशिवाय राहू शकत नाही तसं मुले सुद्धा आईशिवाय राहू शकत नाही. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला कामावर जाणाऱ्या आईला रडत रडत लवकर परत येण्याची विनवणी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : ‘बाबांशिवाय अपूर्ण…’ वाजत, गाजत नाही तर अशा प्रकारे आली नवरी मंडपात; Viral Video पाहून तुमच्याही डोळ्यांतून येईल पाणी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन चिमुकले बहीण भाऊ कामावर जाणाऱ्या आईला निरोप देताना दिसत आहे. व्हिडीओत मुलगा आईला रडत रडत म्हणतो, ” आई लवकर येशील. उशीर नको करशील.. बाय बाय.. उशीर नको करशील प्लीज,लवकर ये” चिमुकला रडत रडत आईला बाय करतो. मुलाचे निरागस प्रेम पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “सकाळी आपल्या काळजाच्या तुकड्यांना सोडून कामावर जाणाऱ्या आईला घरी लवकर येण्यासाठी किती तळमळीनं विनवणी करतात तिची मुलं”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : IRCTC Down : रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! आयआरसीटीसीची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा ठप्प; नेमकं कारण काय? वाचा

priti_tuzi_mazi_10 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती निरागस आहे हे बाळ त्याच त्याच्या आईवरच प्रेम दिसून आलं” तर एका युजरने लिहिलेय, “काय करावं परिस्थिती खूप विचित्र असते याच दुःख एक आईच समजू शकते” आणखी एका युजरने लिहिलेय, “पूर्ण अंतःकरणातून तो रडून सांगतोय मम्मा लवकर ये… लहान मुलं आई पासून लांब राहूच शंकत नाहीत ….” एक युजर लिहितो, “मुलांना किती आधार असतोय आईचा हे कळणार नाही त्या मुलांनाच ते माहिती त्यांना आईला सोडून राहायचं” अनेक युजर्सनी आई आणि मुलांच्या नात्यातील प्रेम आणि गोडवा सांगितला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.