Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात, तर काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात.
सध्या अशाच एका चिमुकल्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिमुकला ढोल ताशाच्या तालावर अनोखा डान्स करताना दिसत आहे. या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, चिमुकला ढोल ताशाच्या तालावर डान्स करत आहे. चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हीही चक्रवाल. चिमुकल्याचा अनोखा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ढोल ताशाच्या गजरात डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण या चिमुकल्याचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हेही वाचा : कुत्र्याला दूध पाजण्यासाठी चिमुकल्याची धडपड; नेटकरी म्हणाले, “यालाच म्हणतात संस्कार”
anita_suresh_sharma या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले, “जबरदस्त डान्स”, तर एका युजरने लिहिले, “मला माझ्या लहानपणीची आठवण आली.” आणखी एका युजरने लिहिले, “ढोल ताशावर डान्स करायला मलासुद्धा खूप आवडते”