Viral Video : २६ जानेवारी हा दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी कार्यक्रम, परेड, भाषण, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालयात शाळकरी मुले, पाहुणे मंडळी भाषणांद्वारे या दिवसाचे महत्त्व सांगतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला २६ जानेवारी दिनानिमित्त भाषण देताना दिसतो. त्याचे भाषण ऐकून तुम्ही खळखळून हसाल. चिमुकला नेमका काय म्हणतो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (Video : a child funny speech on 26 January republic day by watching video you can not stop laughing video goes viral)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकला म्हणतो, “२६ जानेवारी खूप छान असतो आणि २६ जानेवारीच्या दिवशी खूप मजा येते. २६ जानेवारी २५ जानेवारीनंतर येतो आणि २६ जानेवारी २६ जानेवारीच्या दिवशी येतो. २६ जानेवारी आपल्या देशात यासाठी साजरा केला जातो कारण त्या दिवशी २६ जानेवारी असतो. २६ जानेवारीचा आणखी एक फायदा म्हणजे शाळा आणि कोचिंगमध्ये आपल्याला बुंदी मिळते. २६ जानेवारी म्हणजे लहान मुलांसाठी आनंद घेऊन येतो कारण त्या दिवशी शाळेला सुट्टी असते. सर्व मुलांकडून सरकारला ही मागणी आहे की २६ जानेवारी १५ दिवस साजरा करावा जेणेकरून मोठ्या उत्साहाने साजरा करता येईल. धन्यवाद.”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

comedycentralite या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “२६ जानेवारीसाठी माझे भाषण” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाऊ एक ओळ विसरला, २६ जानेवारी २७ जानेवारीच्या एक दिवसापूर्वी येतो” तर एका युजरने लिहिलेय, “जेव्हा बॅकबेंचर्सला भाषण देण्यासाठी आग्रह केला जातो” आणखी एका युजरने लिहिलेय, “२६ जानेवारी रविवारी आला तर दु:ख होते” एक युजर लिहितो, “मला अशा प्रकारचा आत्मविश्वास पाहिजे.