Viral Video : सोशल मिडिया हे कला सादर करण्याचे एक माध्यम झाले आहेत. त्यातील नृत्य कलेवर आधारीत अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असाल. विशेषत: लहान मुलांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. लहान मुले इतके सुंदर डान्स करतात की पाहून कोणीही थक्क होईल. सध्या अशाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही तिचे चाहते होईल. तिच्या डान्सवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
चिमुकलीचा डान्स पाहून येईल माधुरी दीक्षितची आठवण! (a little girl dances so gracefully)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली स्टेजवर डान्स करताना दिसेल. तिच्या जबरदस्त डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. ती अप्रतिम डान्स करताना दिसते. या चिमुकलीची ऊर्जा पाहून आपल्यालाही ऊर्जा येईल. हा व्हिडीओआतापर्यंत पाच लाख ४४ हजार लोकांनी लाइक केला आहे. गवर्नमेंट कॉलेज चित्तूर येथील हा व्हिडीओ आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
shiva_isha_ni या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कॉलेज डे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काय ऊर्जा आहे राव” तर एका युजरने लिहिलेय, “माझे शब्द लक्षात ठेवा, ती एक चांगली डान्सर होणार.” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय हावभाव आहे मुलीचे, पाहून थक्क झालो” एक युजर लिहितो, ” १५ वेळा व्हिडीओ पाहिला पण मन भरले नाही” तर एक युजर लिहितो, “याला म्हणतात टॅलेंट” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
या चिमुकलीचे नाव इशानी आहेत. ती खूप सुंदर डान्स करते. सोशल मीडियावर हजारो लोक तिला फॉलो करतात आणि तिच्या व्हिडीओवर लाइक कमेंट करतात.ही चिमुकली तिच्या आईबरोबर फोटो किंवा व्हिडीओ शेअर करते. माय लेकीच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करतात.