Viral Video : सोशल मीडियावर आई-वडील लहान मुलांचे व्हिडीओ शेअर करत असतात. काही व्हिडीओ खूप गमतीशीर असतात, तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकली लिपस्टिक ओठांवर लावताना दिसत आहे आणि नंतर त्याच लिपस्टिकचा नेलपॉलिश म्हणून वापर करत आहे. लिपस्टिक अन् नेलपॉलिशमधला फरक न समजणाऱ्या मेकअप लव्हर चिमुकलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला एक चिमुकली हातात लिक्विड लिपस्टिक घेऊन बसलेली दिसेल. सुरुवातीला चिमुकलीने ही लिपस्टिक तिच्या ओठांवर लावली आणि त्यानंतर त्याच लिपस्टिकचा ती नेलपॉलिश म्हणून वापर करताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत दिसते की, ती लिपस्टिक पायाच्या नखावर लावत आहे.
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडीओमध्ये छोट्या चिमुकलीच्या आईचाही आवाज येत आहे. हा व्हिडीओ तिच्या आईने शूट केला आहे
urs_mogna_chowdary या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आमच्या चिमुकलीला सर्व काही समजते,” या व्हिडीओवर युजर्सच्या मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काही युजर्सनी छोट्या चिमुकलीचे कौतुक केले आहे, तर काही युजर्सनी तिच्या आईच्या शिकवणीवर टीका केली आहे.
एका युजरने लिहिले, “किती गोंडस मुलगी आहे, व्हिडीओ पाहून हसू आवरेना” तर एका युजरने लिहिले, ” कृपया तुमच्या छोट्या गोंडस मुलीला या केमिकल प्रोडक्टपासून दूर ठेवा.” आणखी एका युजरने लिहिले, “छोट्या मुलांना असे केमिकलयुक्त मेकअप प्रोडक्ट वापरायला देणे खूप चुकीचे आहे.”