Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात एक अँकर चिमुकलीशी संवाद साधताना दिसत आहे. या मजेशीर संवाद ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (a child girl funny answer about her father and mother watch viral video on social media)
चिमुकली नको ते बोलून गेली
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन चिमुकल्या स्टेजवर अँकरबरोबर गप्पा मारताना दिसेल. त्यातील एका चिमुकलीला अँकर काही मजेशीर प्रश्न विचारतो त्यावर ही चिमुकली भन्नाट उत्तरे देताना दिसते. चिमुकलीचे उत्तरे ऐकून कोणालाही हसू येईल.
अँकर आणि चिमुकलीमधील संवाद खालील प्रमाणे –
अँकर – तुझं कोणी आवरलं, मम्मी की पप्पांनी?
चिमुकली – मम्मींनी
अँकर – वॉव.. आणि मम्मीचं कोणी आवरून दिलं? मम्मी की पप्पांनी
चिमुकली – पार्लरमध्ये गेली होती
अँकर – मम्मी पार्लरमध्ये जाऊन आलेली आहे. क्या बात है.. सगळं कळतं बाबा तिला. अगं हे सांगायचं नसतं.तुला कोण रागावतं? मम्मी रागावतं की पप्पा?
चिमुकली – मम्मी
अँकर – आणि पप्पाला कोण रागावतं?
चिमुकली – मम्मी
चिमुकलीचे उत्तर ऐकून सर्व जण जोरजोराने हसतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
rjprasanna20 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी सुद्धा शेअर केले आहेत.
यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. निरागस लहान मुले अनेकदा मजेशीर आणि अनपेक्षित उत्तरे देतात. त्यांचे उत्तरे ऐकून पोट धरून हसायला येते. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.या व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव करतात.