पोलिस हा समाजातील असा घटक आहे, जो लोकांच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर असतो. शहरात किंवा गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्याकडे असते.त्यांचे कार्य लाख मोलाचे आहे. अनेकदा आपण पोलिसांना गृहित धरतो. ते ऊन, पाऊस आणि थंडी याची पर्वा न करता दिवसरात्र काम करतात. सणावारांना त्यांच्या कुटूंबाना सोडून आपल्यासाठी कामावर असतात. अनेकदा या पोलिसांकडे आपण साधे आभार सुद्धा व्यक्त करत नाही.
सोशल मीडियावर पोलिसांसंदर्भात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली रस्त्यावरुन जात असलेल्या पोलिसांना पाहून सलाम करताना दिसत आहे. चिमुकलीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
लोकांच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र काम करणाऱ्या पोलिसांचे आपण कधीच आभार मानत नाही पण चिमुकलीने सलाम करुन त्यांच्याविषयीचा जो आदर दाखवला ते पाहून तुमचेही डोळे भरुन येईल.
हा व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. तुम्हाला व्हिडीओत दिसेल काही पोलिस पहारा देत रस्त्यावरुन जात आहेत. ते आपआपसात बोलण्यामध्ये मग्न असतात. अचानक तिथे एक चिमुकली येते आणि पोलिसांना सलाम करते. चिमुकलीने अचानक केलेला सलाम पाहून पोलिस थक्क होतात आणि त्यातलेच एक पोलिस अधिकारी त्या चिमुकलीचा सलाम पाहून तिला पुन्हा सलाम करतात. त्यानंतर ही चिमुकली लाजते आणि पळत सुटते. हा व्हिडीओ नीट पाहिला तर तुम्हाला कळेल की कोणीतरी तिला पोलिसांना सलाम करण्यास सांगत आहे. यावरुन चिमुकलीला संस्कार देत असल्याची जाणीव होते. हा व्हिडीओ पाहून तुमचाही ऊर भरून येईल. चिमुकलीने केलेला सलाम पाहून युजर्ससुद्धा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
हेही वाचा : VIDEO : फक्त चालण्यासाठी केवढा तो संघर्ष! मद्यपीचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
चटपटी सी ये ज़िन्दगी या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इंडियन आर्मीचा फॅन या व्हिडीओकडे दुर्लक्ष करणार नाही.” ४७ हजार पेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ बघितला आहे.