Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्सचे व्हिडीओ इतके सुंदर असतात की पाहून कोणीही थक्क होईल. सोशल मीडियावर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांचे डान्सचे व्हिडीओ दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली खूप सुंदररित्या भरटनाट्यम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही तिचा चाहता होईल.(a child girl presents amazing Bharatanatyam classical Indian dance video goes viral on social media)
(चिमुकलीने सादर केले अप्रतिम भरतनाट्यम (a little girl Classical Dance Video Wins Hearts)
हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे आणि एक चिमुकली स्टेजवर भरतनाट्यम सादर करत आहे.तिने भरतनाट्यमचे पोशाख म्हणजे नृत्यांगना परिधान केले आहेत. पायात घुंगरू घालून ती मृदंगम, नादस्वरम, नट्टुवंगम (झांज), बासरी, व्हायोलिन आणि वीणा यांच्या तालावर सुंदर भरतनाट्यम सादर करत आहे. या दरम्यान तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. चिमुकलीने अतिशय सुंदर असे भरतनाट्यम सादर केले आहेत. या गोंडस चिमुकलीचा व्हिडीओ तीन लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.
भरतनाट्यम हे भारतीय शास्त्रीय नृत्य आहे. या नृत्यप्रकारामागे प्रचंड मोठा इतिहास आणि परंपरा आहे. या नृत्यशैलीचा धार्मिक कार्यात सुद्धा समावेश केला जातो. भरतनाट्यम जरी प्राचीन नृत्यशैली असली तर तमिळनाडूमध्ये याला भरपूर प्रोत्साहन मिळाले.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
dipalitosa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चिमुकलीने किती सुंदर डान्स केला” तर एका युजरने लिहिलेय, “काय टॅलेंट आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स अप्रतिम आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी प्रार्थना करते की मला सुद्धा अशी गोड मुलगी हवी” एक युजर लिहितो, “भविष्यात माझी मुलगी सुद्धा अशीच असेल” अनेक युजर्सनी चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.