Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी मुले डान्स करताना दिसतात तर कधी मुले गाणी म्हणताना दिसतात. कधी रडताना दिसतात तर खळखळून हसताना दिसतात पण तुम्ही कधी लहान मुलांना रॅम्प वॉक करताना पाहिले आहे का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहे. चिमुकलीचा रॅम्प वॉक पाहून तु्म्हीही थक्क व्हाल. मॉडेललाही लाजवेल असा रॅम्प वॉक करताना ही चिमुकली दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका फॅशन शोच्या कार्यक्रमातील आहे. या फॅशन शो मध्ये चिमुकल्यांनी सहभाग घेतलेला दिसत आहे. या व्हिडीओत अनेक चिमुकले रॅम्प वॉक करताना दिसत आहे पण व्हिडीओ पाहिल्या नंतर तुमची नजर एका चिमुकलीवर जाईल. ही चिमुकली अतिशय सुंदर रित्या रॅम्प वॉक करत पुढे येते. तिचे चेहऱ्यावरील हावभाव आणि पोझ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पांढरा क्रिम रंगाच्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. एवढ्या कमी वयात ती सुंदरपणे रॅम्प वॉक करताना दिसतेय. तिचा रॅम्प वॉक पाहून काहींना त्यांच्या आवडत्या मॉडेलची आठवण आली असेल. हा व्हिडीओ चिमुकलीच्या शाळेतील कार्यक्रमातील असावा. शाळेत असे अनेक कार्यक्रम राबविले जातात.
चिमुकलीच्या पालकाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. hijas_nv या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझी मुलगी इवा हिजास” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पोरीला कोणाची नजर लागू नये. खूप खूप आशीर्वाद” तर एका युजरने लिहिलेय, “भावी मॉडेल” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती गोड मुलगी आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर करत चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.