Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली शाळेत प्रार्थना म्हणताना दिसत आहे. चिमुकली इतक्या गोंडसपणे प्रार्थना म्हणते की ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. चिमुकलीचा निरागसपणा तुम्हालाही आवडेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. शाळेच्या आठवणी कायम लक्षात राहतात. शाळेचे मित्र, शिक्षक, वर्गखोली, मैदाने, खेळ, प्रार्थना अशा किती तरी गोष्टी आहे ज्या कायम मनात घर करुन राहतात. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या शाळेचे दिवस सुद्धा आठवतील तर काहींना या चिमुकलीची प्रार्थना ऐकून शाळेतल्या प्रार्थनेच्या वेळीचे त्यांचे मजेशीर किस्से आठवतील.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल शाळेच्या मैदानावर प्रार्थना सुरू आहे. रांगेत चिमुकले विद्यार्थी उभे आहेत. पण एका चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चिमुकलीने शाळेचा गणवेश घातला असून त्यावर स्वेटर आणि कानटोपी घातली आहे. सध्या हिवाळा सुरू आहे. थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी शाळेत प्रार्थना म्हणतानाचा हा व्हिडीओ आहे. ही चिमुकली इतनी शक्ती हमे देना दाता “इतनी शक्ति हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना” ही प्रार्थना म्हणताना दिसते. ती हात जोडून डोळे बंद करुन निरागसपणे ही प्रार्थना म्हणताना दिसते. तिचा निरागसपणा पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.
हेही वाचा : नशीब लागतं असा नवरा भेटायला! भर मंडपात बायकोला लक्ष्मी समजून पाया पडणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
geetdeopa या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शाळेचा पहिला दिवस” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “प्रार्थना म्हणताना एवढा आत्मविश्वास दे देवा” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच व्हिडीओ पाहून शाळेची आठवण आली.” आणखी एका युजरने लिहिलेय, “चिमुकली प्रार्थना खूप मनापासून म्हणतेय”