Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते. कधी लहान मुले खळखळून हसताना दिसून येतात तर कधी हीच लहान मुले ओक्साबोक्शी रडताना दिसून येतात. कधी मनसोक्त नाचतात तर कधी मजा मस्ती करतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओमध्ये चिमुकली चप्पलला बाळ समजून प्रेम करताना दिसत आहे. काही लोकांना व्हिडीओ पाहून खूप हसायला येईल तर काहींना तिचा निरागसपणा पाहून बालपणाची आठवण येईल.सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
बालपण हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बालपणीच्या आठवणी नेहमी मनाच्या कोपऱ्यात जीवंत असतात. असे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली खूर्चीवर बसली आहे आणि तिच्या शेजारी तिने एका रुमालवर चप्पल ठेवली आहे आणि त्यावर दुसरी रुमाल ओढलेली आहे आणि चप्पलवर प्रेमाने हात फिरवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरूवातीला तुम्हाला कळणार नाही की ती नेमकी काय करते पण नंतर लक्षात येईल की ती चप्पलला बाळ समजून चप्पलवर प्रेम करताना दिसत आहे. व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की ती चप्पलला हातात पकडून लहान बाळाप्रमाणे कुशीत घेते आणि झोपवण्याचा प्रयत्न करते. नंतर पुन्हा ती खूर्चीच्या बाजूला रुमालवर चप्पलला ठेवते आणि त्यावर पुन्हा रूमाल ओढते. चिमुकलीचा हा निरागसपणा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काहींना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या मुलांची आठवण येईल तर काहींना त्यांचे बालपणीचे दिवस आठवेल.

maharashtra_trending_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जगाची चिंता कशाला?” या व्हिडीओ वर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती गोंडस” तर एका युजरने लिहिलेय, “बालपण आठवले” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.