Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुकला चक्क अजगराबरोबर खेळताना दिसत आहे. चिमुकल्याचा हा व्हिडीओ पाहून कोणालाही घाम फुटेल.
लहान मुलांना तुम्ही अनेकदा खेळण्याबरोबर खेळताना पाहिले असेल पण चक्क अजगराबरोबर खेळताना पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो.
साप किंवा अजगर, हे शब्द जरी तोंडातून बाहेर पडले तरी अंगावर काटा येतो. लहानांपासून मोठे सर्वजण सापाला घाबरतात पण या चिमुकल्याची अजगराबरोबरची अनोखी मैत्री पाहून तुम्हीही भारावून जाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Indian Navy Day : भारत चार डिसेंबरला ‘नौदल दिन’ का साजरा करतो? या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल. तो चक्क अजगराबरोबर खेळताना दिसतोय. तो अजगराच्या पाठीवर बसतो. त्यांचे तोंड धरुन त्याला ओढण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या खेळणीप्रमाणे तो अजगराशी खेळताना दिसत आहे. या मुलाचा हा धीटपणा पाहून कोणीही थक्क होईल.

rbempire_tv या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गावाकडचे जीवन” तर एका युजरने लिहिलेय, “हा पाळीव अजगर असल्यासारखा दिसतोय. या व्हि़डीओवर अनेक युजर्सनी संताप सुद्धा व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “बापरे लोकं का मुलांचे जीव धोक्यात टाकताहेत?” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्ही मुर्ख आहात का?” आणखी एका युजरने लिहिलेय, “भयानक आणि धक्कादायक”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A child playing with python outside his home video goes viral on social media ndj