उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभकार्यात किंवा लग्न समारंभात लयबद्ध पद्धतीने आवडीने जोडीदाराचे नाव घेतले जाते यालाच आपण उखाणा म्हणतो. पूर्वी महिला त्यांच्या पतीसाठी उखाणा घ्यायच्या आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने पत्नीसाठी उखाणा घेताना दिसतात.

सोशल मीडियावर पुरुष किंवा महिलांचे उखाणे घेतानाचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अविवाहित तरुणींचे सुद्धा उखाणा घेतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे पण चिमुकल्याला उखाणा घेताना तुम्ही कधी पाहिले आहे का? हो, एका चिमुकल्याने चक्क उखाणा घेतलाय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा चिमुकला एक दोन नव्हे तर तब्बल तीन मजेशीर उखाणे घेताना दिसतो. सध्या व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. (Viral video : Child’s Hilarious Ukhana Video viral on Social Media)

Punekar man wrote funny message in back of the tempo video goes viral on social media puneri pati
VIDEO: “ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला?…” पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की पाहून रस्त्यानं सगळेच हसू लागले
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Bigg Boss 18 Fame Vivian Dsena Share Special post for wife nouran aly
Video: ‘तुम ही हो’ गाणं गात विवियन डिसेनाने पत्नीला दिली फ्लाइंग किस, अभिनेत्याचा पाहा रोमँटिक अंदाज
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो
netizen troll to marathi singer juilee joglekar for her kandepohe performance
Video: “वेगळं काय तरी करा…”; जुईली जोगळेकरच्या ‘त्या’ परफॉर्मन्सवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, गायिका म्हणाली…
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन

चिमुकल्याने घेतले भन्नाट उखाणे

हा व्हायरल व्हिडिओ एका सांस्कृतिक कार्यक्रमातला आहे. या व्हिडिओमध्ये अँकर एका चिमुकल्या जवळ माईक घेऊन उभी दिसत आहे. चिमुकला तब्बल तीन उखाणे म्हणतो
तिसरा उखाणा घेताना हा चिमुकला म्हणतो, “करुंदवड माझं गाव, गावात घर.. घरात डबा, डब्यात गहू.. लग्न झालं नाही, नाव कोणाचं घेऊ.”
तर दुसरा उखाणा म्हणतो, “माझी सायकल सोन्याची सीट मी आणि माझी बायको डबल सीट” तिसरा उखाणा घेताना म्हणतो, “तु आहेस क्लास, पण माझी अडाणी बायको फर्स्ट क्लास” हे सर्व उखाणे ऐकून अँकर सह सर्व जण पोट धरून हसतात.

हेही वाचा : “देव नाही पण माणूस होऊन पाहा”! रस्त्यावर पाण्यासाठी भटकणाऱ्या गरीब चिमुकल्यांचा Video पाहा; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : ‘देवा, असे आई-वडील कोणालाच देऊ नको…’ सिंहाने जिराफ नर-मादीसमोर पिल्लावर केला क्रूर हल्ला; ते दोघेही फक्त पाहात राहिले… VIDEO पाहून नेटकरी हळहळले

Ajay murhe _1290 इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय. “छोटा पाकीट मोठा धमाका” व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भारी बोललास भावा” तर अरे एका युजरने लिहिलेय, “बरीच तयारी करून ठेवली आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “लग्न झाले तर काय होईल?” एक युजर लिहितो, “आताच बोलून घे सगळं नंतर नाही मिळत बघ” तर एक युजर लिहितो, “मला शिकवायला ये बाळा” अनेक युजर्सने या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये हसण्याचे इमोजी शेअर केले आहे

Story img Loader