Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर इतके मजेशीर असतात की पोट धरून हसायला येते. लहान मुले खूप निष्पाप असतात. त्यांना जे वाटतं ते न घाबरता ते बोलतात. त्यामुळेच ‘मुले ही देवा घरची फुले’ असे म्हणतात.
सध्या असाच एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या चिमुकल्याला जेव्हा शिक्षिका विचारते की तुला मोठा झाल्यानंतर काय बनायचं आहे तेव्हा चिमुकला मजेशीर उत्तर देतो आणि त्यामागील कारण सांगतो. चिमुकल्याचं उत्तर आणि त्यामागील कारण ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (A child said he does not want to get married, he wants to become a truck driver because the wife takes all the money funny video goes viral on social media)
या व्हायरल व्हिडीओ एका शाळेतील एका वर्गातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला बाकावर काही विद्यार्थी दिसेल. त्यातील एका विद्यार्थ्याला शिक्षिका मोठा झाल्यानंतर काय बनशील, असं विचारते त्यावर तो काय उत्तर देते, हे आज आपण जाणून घेऊ या.
शिक्षिका – मोठा झाल्यावर काय बनणार?
विद्यार्थी – ट्रक ड्रायव्हर
शिक्षिका – ट्रक ड्रायव्हर का?
विद्यार्थी – लग्न करून काय करणार, बायको सर्व पैसे घेते.
शिक्षिका – वडील देतात पैसे आपल्या मुलांना. तु देणार नाही, जेव्हा तु मोठा होशील?
विद्यार्थी – मला लग्न नाही करायचं. मला ट्रक ड्रायव्हर बनायचं. सोळा चाकी चालवायची आहे. मोठे ट्रक.
शिक्षिका – शिकून तुम्हाला आयपीएस ऑफिसर बनायचं आहे
विद्यार्थी – एका अटीवर बनणार. आयपीएस ऑफिसर.. मला लग्न करायचं नाही
चिमुकल्याचे उत्तर ऐकून शिक्षिकेला हसू आवरत नाही. सध्या हा मजेशीर व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तीन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : VIDEO: “कुणालाच हलक्यात घेऊ नका” एका सेकंदात कासवाने गिळला जिवंत खेकडा, शिकारीची ‘ही’ भयानक पद्धत एकदा पाहाच
bablu___bhaii या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ट्रक लव्हर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावाने मन जिंकले. लग्न करायचं नाही” तर एका युजरने लिहिलेय, “दहा वेळा व्हिडीओ पाहिला” आणखी एका युजरने लिहिलेय, “वय कमी आहे, पण ज्ञान जास्त आहे” अनेक युजर्सनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.