सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पालकांकडून शेअर केले जातात. अनेकदा चिमुकल्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते. सध्या असाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये या चिमुकल्याला वन, टू, थ्री, फोर म्हणायला सांगतात, तेव्हा चिमुकला वन, टू, थ्री म्हणायला सुरुवात करतो. त्याचे पाढे ऐकल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका चिमुकल्याला इंग्रजीत १ ते २० पर्यंत पाढे म्हणायला सांगतात; तेव्हा हा चिमुकला वन, टू, थ्री म्हणायला सुरुवात करतो, पण अचानक इलेव्हननंतर ट्वेल म्हणण्याऐवजी टिलेव्हन म्हणतो. चिमुकल्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
आई-वडील लहान मुलांना घरी कधी पाढे तर कधी ABCD शिकवत असतात. असाच वन, टू, थ्रीचा पाढा पाठांतर घेतानाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : नदीत पडलेल्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी केला जुगाड; कुत्र्याने तोंडात दोरी पकडून …; पाहा व्हायरल व्हिडीओ

veeraj_vk_official या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या चिमुकल्याचे नाव विराज असून तो सांगली येथील रहिवासी असल्याचे या अकाउंटच्या बायोमध्ये लिहिले आहे. या अकाउंटवर आई-वडील त्याचे अनेक मजेशीर फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात. सोशल मीडियावर विराजचे भरपूर चाहते आहेत.
या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी हसणारे इमोजी शेअर केले आहेत.नेक युजर्सनी हसणारे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader