Viral Video : सोशल मीडियावर आई वडिलांवर प्रेम व्यक्त करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ भावूक करणारे असतात. अनेकदा सोशल मीडियावर वडिलांपेक्षा आईची महती सांगणारे अनेक व्हिडीओ दिसतात. आईचे सहसा सर्वत्र कौतुक केले जाते पण वडिलांविषयी फार बोलले जात नाही.
सध्या एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुकला वडिलांवर आधारीत एक लोकप्रिय गाणं गाताना दिसतो. विशेष म्हणजे चिमुकला गाणं गाताना ढसा ढसा रडतो. हे गाणं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल आणि कदाचित तुम्हालाही अश्रु अनावर होणार. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
गाणं गाताना चिमुकला ढसा ढसा रडला
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला शेतात उभा आहे आणि रडत रडत वडिलांवर आधारीत गाणं म्हणताना दिसत आहे. या गाण्याचे लिरीक्स ऐकून कदाचित तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. चिमुकला गाताना म्हणतो,
“आई म्हणजे घराची भिंत बाप आहे पाया घराचा, त्याच्या अंगावर भार कुटुंब संसाराचा..
पत्नीला जरीची साडी, नवे कपडे मुलांना आणून..
बाप माझा गावभर फिरतो, फाटलेली बनियान घालून…
फाटकी चप्पल केसाला नाह फणी
बाप माझा वेदनांचा धनी” चिमुकला रडत रडत हे गाणं गातो. त्याचा हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल.
हेही वाचा : लहान मुलांना समुद्रकिनारी घेऊन जाऊ नका! थोडक्यात वाचला चिमुकला, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
या व्हिडीओवर लिहिलेय, “संकटाना झेलत, कुटुंबाला पेलत वाच कधी चुकत नाही
का कुणास ठाऊक बाप कुणा कळत नाही…
चेहरा वरुन कठोर तरी मन हळवं दाटलेलं
पिलांवरची नजर काही हटत नाही
का कुणास ठाऊक बाप कुणाला कळत नाही.”
पाहा व्हायरल व्हिडीओ
adiraje2121 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सगळे म्हणती आईची वेडी माया
तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया,
माया बाबांची असते नारळ
खरे राग आला जरी वर आतून प्रेमाचे झरे.
कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात
देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात
ढाल बनुनी बाप उभा राहिला दारात
हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात
माया बाबांची असते कस्तुरीपरी
दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी
येईल वृद्धपणी, जेव्हा बाबांसाठी व्हा तुम्ही
त्यांच्या आधाराची एक काठी..!!!”
तर एका युजरने लिहिलेय, “या जीवनात आई वडीला पेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणी नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाप हा बाप असतो..” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर करत कौतुकाचा वर्षाव केला आहेत.