Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी कोणी डायलॉग म्हणताना दिसतात तर कधी कोणी स्टंट दाखवताना दिसतात. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण व्हिडीओ रील्स बनवताना दिसतात. काही रील्स पाहून पोट धरून हसायला येते तर काही रील्स पाहून प्रेरणा मिळते. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली टेन्शन फ्री जीवन जगण्यासाठी अनोखा मंत्र सांगताना दिसते. चिमुकलीचे बोलणे ऐकून एका क्षणासाठी तुमच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य येईल. (a child told amazing message for tension free life and suggested never take stress of people watch viral video)

गोंडस चिमुकलीने सांगितला टेन्शन फ्री जगण्याचा कानमंत्र

या व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकली म्हणते, “लोकांचा जास्त लोड नाही घ्यायचा. डोळे बंद करायचे अन् बोलायचं उडत गेले सगळे” चिमुकलीने हा संदेश त्या लोकांना दिला आहे जे छोट्या छोट्या गोष्टीचे टेन्शन घेतात. तिचा हा संदेश ऐकुन कोणाच्याही चेहऱ्यावर हसू येईल.

Groom funny dance at baarat video went viral on social medi
मुलांनो असा डान्स येत असेल तरच लग्न करा! वरातीत नवरदेवाने धरला ठेका, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Viral Video Of Cat And Her Little kitten
‘आई ती आईच…’ १० पावले चालल्यावर पिल्लाला मागे वळून पाहणाऱ्या मांजरीने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा हृदयस्पर्शी Viral Video
When The teacher asked students for homework students told hilarious reason
“गृहपाठ का केला नाही?” विद्यार्थ्यांनी दिलेली कारणं ऐकून आठवेल तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस, मजेशीर VIDEO व्हायरल
a child girl funny answer about her father and mother
“पप्पाला कोण रागावतं?” चिमुकली नको ते बोलून गेली; पाहा मजेशीर Viral Video
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Couple dance video husband wife dance in wedding on marathi song
VIDEO: आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे! नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले
Viral video of groom ukhana at wedding navardevacha ukhana viral on social media
“मुलगी काळी…”, नवरदेवाने घेतला जगात भारी उखाणा, VIDEO पाहून कराल कौतुक

हेही वाचा : “करवल्या गो करवल्या नाजुक-साजुक”; आजीनं नातवाच्या लग्नात केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, हौसेला वय नसतं!

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

rrghuge_s_world या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या वयात खूप स्ट्रॉंग झालेस तू …ग्रेट ” तर एका युजरने लिहिलेय, “किती भारी आहे तू ताई” आणखी एका युजरने लिहिलेय, “डोळे बंद करायचे आणि बोलायचं ओम भट्ट स्वाह” एक युजर लिहितो, “आज सर्व टेन्शन गेलं हिच्या दोन शब्दांनी” तर एक युजर लिहितो, “अगदी खरंय बाळा त़ुझं” एका युजरने लिहिलेय, “कसली गोड आहेस गं.. नजर लागेल तुला” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : Video : “ती कलेक्टर मॅडमची मुलगी असती तर?”, सहा दिवसांपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरडीच्या आईची प्रशासनाला आर्त हाक

कोण आहे ही चिमुकली?

ही चिमुकली फक्त चार वर्षाची आहे. rrghuge_s_world या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या चिमुकलीचे असे अनेक व्हिडीओ शेअर केले जाते. तिच्या प्रत्येक व्हिडीओवर लोक कौतुकाचा वर्षाव करतात.

Story img Loader