Trending Video: हल्लीची लहान मुलं पटकन नवनवीन गोष्टी शिकतात, अनेकदा अभ्यासापेक्षा त्यांचे सोशल मीडियाच्या ट्रेंडवर अचूक लक्ष असते. एखादे नवीन गाणे आले की ते त्यांच्या नेहमीच तोंडपाठ असते, रील्समधील गाणी ते नेहमी पटापट बोलतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील असाच एक लहान गोड मुलगा एका भक्तीगीतावर अभिनय करताना दिसतोय, जे पाहून नेटकरी कौतुक करताना दिसतायत.

सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं, कुठला व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून सतत विविध भाषेतील, विविध देशातील नवनवीन गाणी व्हायरल होतात, ज्यावर लाखो लोक रील बनवतात. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही सोशल मीडियावर रील्स बनवायला खूप आवडतं. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
prank with sandwich seller | Funny Viral Video
“हे सँडविच कोणी बनवले?” तरुणाने जोराने ओरडत विचारले, विक्रेता घाबरत पुढे आला अन्… पाहा व्हायरल VIDEO
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Grandmother dance in wedding video goes viral on social media trending video
VIDEO: “हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला” आजीपुढं नातीसुद्धा फिक्या; नऊवारी साडीत डोक्यावर पदर घेत आजीचा भन्नाट डान्स
A girl stunning dance on a Bollywood song
“आईशप्पथ, काय ते एक्स्प्रेशन्स अन् ते ठुमके…” बॉलीवूड गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Rich Man Gives A Poor Balloon Seller A Ride In His Luxury Porsche Car Emotional Video
माणुसकीचं अनोखं दर्शन! तरुणाने जे केलंय ते क्वचितच कोणी करेल…VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
Ganpati aagaman rush in aagman sohala shocking video
गणपती आगमनाची भीषण बाजू; VIDEO पाहून थरकाप उडेल, पाहा आणि तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला मोबाइलमधील रील्स बघत बघत एका भक्तीगीतावर जबरदस्त एक्स्प्रेशन्स देताना दिसतोय. चिमुकल्याचे हे एक्स्प्रेशन्स पाहून नेटकरी त्याचे प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा: “आईशप्पथ, काय ते एक्स्प्रेशन्स अन् ते ठुमके…” बॉलीवूड गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @payasamhema या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. शिवाय याला एक लाखाहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. तसेच अनेक जण यावर कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. यातील एकाने लिहिलंय की, “पॉवर ऑफ कुरकुरे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “भक्तीमय एक्स्प्रेशन.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “मुलं कोणत्याही गाण्यावर एक्स्प्रेशन्स देऊ शकतात.” तर आणखी एकाने त्याच्या गाण्याचे कौतुक केले आहे.