Viral Video : २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा पार पडली. या दरम्यान सोशल मीडियावर ऑलिम्पिकमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. एवढंच काय तर गाव खेड्यातील तरुण मुला मुलींचे अनेक खेळांचे व्हिडीओ सुद्धा सध्या व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला शेतामध्ये उंच भाला फेकताना दिसत आहे. या चिमुकल्याचा भालाफेक पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला एक शेत दिसेल. या शेतामध्ये एक चिमुकला हातात भाला घेऊन उभा आहे. आणि नंतर उंच भाला फेकताना दिसतो. त्याने फेकलेला भाला पाहून कोणीही अवाक् होईल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून नीरज चोप्राची आठवण येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “सरकारने अशा लहान वयातील खेळाडूंवर लक्ष दिले पाहिजे राव, हा मुलगा व्हायरल झाला पाहिजे. योग्य मार्गदर्शन भेटल्यास हा खूप पुढे जाऊ शकतो.”
पाहा व्हायरल व्हिडीओ
mpsc_studentt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “याला पाठवायला पाहिजे होता ऑलम्पिकला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कितीतरी टॅलेंट योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने गावातच राहून जातात ” तर एका युजरने लिहिलेय, “भारतात अशा मुलांची कमी नाही…फक्त त्यांना योग्य ती साथ आणि मार्गदर्शन मिळत नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक नंबर भावा, एकदिवस तु देशासाठी मेडल जिंकशील.”
हेही वाचा : व्यक्तीनं धमकी दिली अन् पुढच्याच क्षणी मेट्रो स्टेशनच्या छतावरुन मारली उडी; श्वास रोखणारा VIDEO व्हायरल
एक युजर लिहितो, “नीरज पेक्षा लांब फेकला पटठ्याने” तर एका युजरने लिहितो, “आपल्या देशात अशी भरपूर मुलं आहेत जी जगात भारताला वेगळाच रुबाब मिळवून देऊ शकतात पण कधी त्यांची घरची परिस्थिती आड येते तर कधी त्या मुलांच्या आई वडिलांना डॉक्टर आणि इंजिनियर च्या पलीकडे विचार येतं नाहीत… नक्कीच ऑलिम्पिक मध्ये सुवर्णंपदक मिळवील हा मुलगा. १००% अतुलनीय… आज कालच्या आई वडिलांनी यातून प्रेरणा घ्यावी.”