सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ कायमच लक्ष वेधून घेत असतात. वेगवेगळ्या कला दाखवून मंत्रमुग्ध केलं जातं. त्यामुळे नेटकऱ्यांना कायमच अशा व्हिडीओबाबत आकर्षण असतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक कोरिओग्राफर रस्त्यावर स्कर्ट घालून डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. खरं तर हा डान्स कोरिओग्राफर जैनील मेहता याचा आहे. जो आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याने आपले चाहते आणि फॉलोअर्सती मनं जिंकत आहे. अनेक व्हिडीओंमध्ये, स्कर्ट परिधान केलेल्या जनीलने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या महिन्यात इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये स्कर्टसोबत शर्ट घातला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओत जैनील ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘झूम रे गोरी’ या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसत आहे. .या गाण्यावर गरबा करताना दिसत आहे. ‘झूम रे गोरी’ हे आलिया भट्टवर चित्रित केलेले गाणे आहे. आतापर्यंत १७ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘माझ्यासाठी हे फक्त नृत्यदिग्दर्शन नाही, तर रस्त्यावर नाचण्याचा आणि लोकांशी संवाद साधण्याचा हा एक अद्भुत मार्ग आहे! माझ्यासाठी हे गाणे मी किती चांगल्या प्रकारे नृत्य आणि नृत्यदिग्दर्शन करू शकतो याबद्दल नाही, तर मी स्वत: ला किती चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकेन आणि संगीताचे खरे सार बाहेर आणू शकेन! #meninskirts बद्दल तुम्हाला काय वाटते ते मला सांगा.’

सोशल मीडियावर नेटकरी या व्हिडीओला पसंती देत आहे. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडीओवर एका यूजर्सने लिहिले, ‘हे खूप सुंदर आहे.’ दुसर्‍या युजर्सने लिहिले, ‘डान्स परफॉर्मन्सचा पुरेपूर आनंद घेतला! किती ऊर्जा आहे.’