Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुले, तरुण मंडळी आणि एवढचं काय तर वयोवृद्ध लोकंही आवडीने डान्स करताना दिसून येतात.अनेक जणांना बॉलीवूड गाण्यावरही डान्स करायला आवडते. अशात नव्वदच्या दशकातील गाणी आजही विशेष लोकप्रिय आहेत.सध्या असाच एक तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी माधुरी दीक्षित यांच्या एका लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
माधुरी दीक्षित बॉलीवूडमधील एक नामवंत अभिनेत्री आणि तितकीच सुंदर डान्सर सुद्धा आहे. त्यांचे अनेक हिट गाण्यांवर अनेक जण आजही सोशल मीडियावर रिल्स बनवत असतात. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. ही तरुणी सुद्धा माधुरी दीक्षितची खूप मोठी चाहती असावी. ती हुबेहूब माधुरीसारखी नाचताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून काही लोकांना माधुरीची आठवण येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा