Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. विचार करा तु्म्ही एखाद्या नदीत किंवा तळ्यात अंघोळ करताना, डुबकी मारताना अचानक तुमच्या पायाखाली मगर आली तर? विचार करुनच अंगावर काटा आला ना..अशीच घटना एका तरुणीसोबत घडली आहे. एवढच नाहीतर मगरीनं चक्क या तरुणीच्या हाताचा लचका तोडलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी नदीत उतरून मासे पकडण्याचा प्रयत्न करत असते. पण अचानक एक मगर तिच्यावर झडप घालते आणि अक्षरश: तिच्या हाताचा लचका तोडते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी पाण्यात उभी आहे आणि अचानक तिच्या उजव्या हातावर मगर झडप घालते. त्यानंतर तरुणी वेदनेने किंचाळते. नशीब म्हणजे तिथेच उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीमुळे तिला मगरीच्या तावडीतून सोडवण्यात यश येते. नाहीतर मगरीनं तिला जिवंत गिळलं असतं. मात्र तिचा हात संपूर्णपणे खाली लटकत असलेला दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ nexus_study नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, परिस्थितीमुळे मृत्यूच्या दारात जावं लागतं नाहीतर आपला जीव धोक्यात कोण घालेल. दुसऱ्याने कमेंट केली – अभिनंदन! तुम्हाला जीवन जगण्याची आणखी एक संधी मिळाली. तर आणखी एकानं, खूप नशीबवान आहे थोडक्यात मृत्यूला चकवा दिला अशी प्रतिक्रिया दिली.