Pune Viral Video : पुण्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, खाद्यसंस्कृती, पुणेरी पाट्या, पुणेरी भाषा सर्वच चर्चेचा विषय ठरतात. पुण्यातील कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कोणी बसमध्ये कंडक्टरबरोबर भांडताना दिसतं तर कधी कोणी रस्त्यावर कोणाबरोबर भांडताना दिसतं. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक रस्त्यावर भांडताना दिसत आहे तर काही लोक हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे हे भांडण बघण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. (Pune Video : A crowd of Punekars to see the fight on the street video goes viral)
“कितीही घाई असली तरी भांडण बघणे सोडायचे नाही”
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ऐन सिग्नलवर काही लोक भांडण करत आहे आणि सिग्नलवर थांबलेले लोक त्यांचे भांडण बघत आहे. जेव्हा सिग्नल सुटतो, तेव्हा सिंग्नलवर थांबलेले लोक पुढे जात नाही तर तिथेच थांबतात आणि भांडण बघतात. रस्त्यावरील भांडण बघण्यासाठी पुणेकरांची गर्दी पाहून तु्म्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. भांडण कोणत्या कारणावरून झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या व्हिडीओवर लिहिलेय, “कितीही घाई असली तरी रस्त्यात थांबून भांडण बघायचं सोडायचं नाही.”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सगळ्यांच आवडतं काम” तर एका युजरने लिहिलेय, “आमचा सातारा रोड आहेच खतरनाक” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाळवेकर लॉन्स समोर, नातूबाग चौक, पुणे-सातारा रोड.” एक युजर लिहितो,”खरा बिगबॉस” तर एक युजर लिहितो, “पुणे तिथे काय उणे” यापूर्वी पुणेकरांचे अनेक भन्नाट व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल. पुणेकर कधी काय करतील याचा नेम नाही. ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत येत असतात.