Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुकली वडीलांबरोबर खेळ खेळताना असं काही करते की पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

वडील मुलीचे नाते हे जगावेगळे असते, एका वडीलांसाठी त्यांची लेक ही जीव की प्राण असते आणि एका मुलीसाठी तिचे वडील हे सुपरहिरो असतात. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दोघे छोटेसे बहिण भाऊ वडीलांबरोबर खेळ खेळताना दिसेल. व्हिडिओच्या सुरुवातीला वडील मुलाबरोबर खेळताना दिसतात. वडील त्यांचे दोन्ही हात जोडून मुलापुढे नेतात व मुलगा त्यांच्या हातावर मारण्याचा प्रयत्न करतो पण वडील मात्र प्रत्येक वेळी हात हुकवण्याचा प्रयत्न करतात. एक दोन वेळा वडील स्वतःहून मुलाच्या हातून हातावर मार घेतात आणि आपल्याला वेदना होत आहे असे नाटक करतात.

हेही वाचा : “वय कितीही झालं तरी बाप हा बाप असतो” आजोबांची दमदार बॅटिंग पाहून झोप उडेल; VIDEO तुफान व्हायरल

पुढे व्हिडिओत तुम्हाला दिसेल की वडील जेव्हा मुलीबरोबर खेळ खेळण्यासाठी तिच्या समोर आपले दोन्ही हात पुढे करतात तेव्हा ती चिमुकली चक्क यांचे दोन्ही हात धरते आणि त्यांच्या हातावर नतमस्तक होते त्यानंतर ती त्यांच्या दोन्ही हाताचे चुंबन घेते. हे पाहून वडील भावुक होतात आणि चिमुकलीचा पापा घेतात. त्यानंतर दोघेही वडील लेक एकमेकांना घट्ट मिठी मारतात. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या वडीलांची आठवण येईल तर काही लोकांना लेकीचं बालपण आठवेन.

पाहा व्हायरल व्हिडीओ

hebaghbhava या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “उगाच म्हणत नाहीत मुलीचा बापामध्ये जास्त जीव असतो.”

हेही वाचा : “आयुष्य एवढं सहज मिळतं का?” रीलसाठी तरुणानं धावत्या बाईकवर काय केलं पाहा; VIDEO पाहून संतापले लोक

या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्यात एका युजरने लिहिलेय,” बापावर मुलाचे जास्त प्रेम असतं पण मुलांना ते व्यक्त करता येत नाही.” तर एका युजरने लिहिलेय, ” व्हिडिओ पाहून वडीलांची आठवण आली.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजपर्यंत पाहिलेला सर्वात भारी व्हिडिओ पण बापावर मुलाचेही प्रेम असते, फक्त मुलगा व्यक्त करत नाही.” एक युजर लिहितो, “पाणी आलं रे बघून डोळ्यात” तर एक युजर लिहितो, “मुलगी सहज बाबाला मिठी मारू शकते पण मुलाचं सगळं आयुष्य निघून जातं तरी त्याला या प्रकारे प्रेम व्यक्त करता येत नाही.”