Disabled Man Driving jugaad Vehicle Viral Video : जर एखाद्या माणसामध्ये परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती असेल, तर त्याला कुणीच रोखू शकत नाही. परिस्थिती कितीही कठीण असली, तरीही हार न मानणारी लोक मोठ्या धाडसाने अशा गोष्टींचा सामना करतात. काही माणसं अपघातात हात गमावल्यानंतर तोंडाने किंवा पायाने लिहिण्याची जिद्द ठेवतात. तर काही लोक असेही असतात, ज्यांना दृष्टी नसते पण ती माणसं त्यांची सर्व कामे चोखपणे करतात. पण ज्यांना हात पाय नाहीत, अशी माणसंही जिद्द ठेवून आयुष्याचा आनंद लुटतात. अशाच प्रकारचा एक जबरदस्त व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@ishivambhati नावाच्या यूजरने एका अपंग माणसाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, सलाम या व्यक्तीला..समस्यांनी उदरनिर्वाह होत नाही. परिस्थिती कशीही असो, पैसै कमवावेच लागतात. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती हातगाडी सारखं वाहन चालवताना दिसत आहे. त्या व्यक्तीला दोन्ही हात आणि पाय नसल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हात पाय नसतानाही या व्यक्तीने देशी जुगाड करून एका हतागाडीला दुचाकीचे साहित्य लावले आणि रस्त्यावरून सवारी केली. व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटतं की, या गाडीचा उपयोग सामान पोहोचवण्यासाठी केला जात असेल. गाडी रस्त्यावरील वर्दळीच्या ठिकाणाहून प्रवास करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – Video : बापरे! गळाला लागला शार्क मासा, पण स्कूबा डायव्हरने पाण्यात उडी मारली अन्…

इथे पाहा हात पाय नसलेल्या माणसाचा प्रेरणादायी व्हिडीओ

या व्हिडीओला आतापर्यंत २५ हजार लोकांनी लाईक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर काही लोकांनी या व्यक्तीच्या जिद्दीला सलाम ठोकला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, ज्यांना हात पाय असतात, ते काहीही करू शकतात, असं म्हणतात. परंतु, या व्यक्तीची जिद्द पाहून मन प्रसन्न झालं आहे. अन्य एका यूजरने म्हटलं, हे भारतीय आहेत, कधीच हार मानत नाहीत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A disabled man makes vehicle by doing desi jugaad people stunned after watching this motivational viral video nss