आयुष्य म्हटलं की संघर्ष हा असतोच. प्रत्येकाला आयुष्यात संघर्ष करावा लागतो. मग जगण्यासाठी असो की आनंदी राहण्यासाठी. प्रत्येकाच्या आयुष्यात छोटी मोठी संकट येत असतात ज्यांच्या सामना प्रत्येकाला करावा लागतो. अनेकदा आपल्याला स्वत:चा संघर्ष खूप मोठा वाटतं असतो. पण काही लोक असेही असतात जे आयुष्यात कितीही संकट आली तरी हार मानत नाही. परिस्थिती, नशीब, अपयशाने ते कधीही खचत नाही, प्रत्येक संकटाला ते जिद्दीने सामोरे जातात. सध्या अशाच एका दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओपाहून अनेकांना आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर Bhojjan_Katta वर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक दिव्यांग व्यक्ती लोकलमधून प्रवास करत आहे. त्याच्याकडे मोठा बॉक्स आहे जो अत्यंत जड असल्याचे दिसते. स्टेशनजवळ आल्यावर तो व्यक्ती त्याचा जड बॉक्स उचल्याचा प्रयत्न करतो. ते पाहून व्हिडीओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती त्यांना मदत करू का असे विचारतो. त्यावर तो व्यक्ती थेट नकार देतो आणि म्हणतो, “माझी सवय तुटून जाईल. तू एकदा मदत रशील, उद्या माझे मलाच करायचे आहे.” एवढंच बोलून तो व्यक्ती त्याचं सामान उचलतो आणि खांद्यावर ठेवतो. स्टेशन आल्यावर तो व्यक्ती स्वत:चे सामान घेऊन उतरतो.

हेही वाचा – निस्वार्थ प्रेम!आजी आजोबांनी नातवंडांसाठी गावावरून आणला खाऊ, लोकलमधील Video Viral

व्हायरल व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. व्हिडीओमध्ये दादा तुमच्या जिद्द आणि चिकाटीला मानाचा मुजरा! असे लिहिलेले दिसते आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असे व्यक्तीमत्त्व”

हेही वाचा – रेल्वेमध्ये प्रवास करताना कधीही ‘ही’ चूक करू नका, नाहीतर तुमच्याबरोबरही…; थरारक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी दिव्यांग व्यक्तीचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले, काकांच्या जिद्दीला सलाम! आणखी एकाने लिहिले, “जबरदस्त … हा खरा स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मविश्वास … सलाम दादाला … किती तरी धडधाकट पण भीक मागताना दिसतात