Viral Video : सोशल मीडियावर पाळीव प्राण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क कुत्रा भाजीपाला खरेदी करताना दिसत आहे. या कुत्र्याला भाजीपाला खरेदी करताना पाहून तुम्हीही म्हणाल की कुत्रा असावा तर असा. हा व्हिडीओ पाहून कोणीही या कुत्र्याच्या प्रेमात पडू शकतो.
सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.कुत्रा हा माणसाचा अत्यंत जवळचा मित्र म्हणून ओळखला जातो. कुत्र्याचा प्रामाणिकपणा जगजाहीर आहे. त्यामुळे अनेक जण आवडीने कुत्रा पाळतात आणि त्याला जीवापाड प्रेम करतात. हल्ली माणसांबरोबर राहून कुत्रा सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकताना दिसतो. तुम्ही कुत्र्याचे माणसाबरोबर खेळतानाचे, जेवण करतानाचे किंवा झोपण्याचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण तुम्ही कधी कुत्र्याला एकट्याने भाजीपाला खरेदी करताना पाहिले आहे का? हा व्हिडीओ पाहून तुम्ही भारावून जाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की कुत्रा एकदा बाजारात जातो आणि भाजीपाला खरेदी करतो. सुरुवातीला तो भाजीचं तोंडात घेऊन त्याच्या मालकीण कडे जातो त्यानंतर तिच्याकडून पैसे आणि टोपली घेऊन येतो.त्यानंतर दुकानदाराला पैसे देतो आणि टोपलीत पुन्हा भाजीचं खरेदी करतो. भाजीचं खरेदी करताना तो पायाने स्पर्श करुन भाजीपाला विक्रेत्याला कोणते भाजीचे पाहिजे, हे सांगताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पण हे खरंय.
हेही वाचा :Cardamom Farming : घरीच लावा वेलची अन् फक्त एका झाडापासून कमवा १० हजार रुपये
pawsitivemoments या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नेहमी माणसांपेक्षा जास्त विचार करतो” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप हूशार आहे आणि प्रामाणिक कुत्रा आहे” तर एका युजरने लिहिलेय, “मला हा कुत्रा खूप आवडला” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती छान कुत्रा आहे आणि तो जे काही काम करतोय, हे पाहून मी थक्क झालो.” एका युजरने लिहिलेय, “कुत्र्याचा मालक खूप नशीबवान आहे” अनेक युजर्सनी कुत्र्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.