Viral Video : भारतीय संस्कृतीत संस्काराला विशेष महत्त्व आहे. घरचे मोठे लहानपणापासून मुलांवर संस्कार करतात.संस्कार म्हणजे चांगल्या सवयी लावणे. याच संस्काराच्या जोरावर मुलांचे व्यक्तिमत्त्व घडते. एक चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात. यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीत संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
तुम्ही आजवर मुलांवर संस्कार केलेले पाहिले असेल पण तुम्ही कधी पाळीव प्राण्यांवर संस्कार केलेले पाहिले आहे का? होय, सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्यावर खूप चांगले संस्कार केल्याचे दिसून येतेय. श्लोक ऐकल्याशिवाय कुत्रा चक्क अन्नाचा एक कण सुद्धा खात नाही.तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला तिच्या घरच्या कुत्र्याला एका भांड्यात अन्न आणून देते आणि त्याला खायला सांगते पण कुत्रा नुसता बघत असतो तेव्हा ती कुत्र्याला “काय झाले” असं विचारते तरी सुद्धा कुत्रा अन्नाचा एक कण सुद्धा खात नाही. पुढे ही महिला विचारते, “श्लोक म्हणायचा आहे?” आणि पुढे श्लोक म्हणण्यास सुरूवात करते. “वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे । सहज हवन होते नाम घेता फुकाचे । जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म। जय जय रघुवीर समर्थ ||” हा श्लोक ऐकताच कुत्रा खायला सुरूवात करतो. व्हिडीओ पाहून काही लोकांना आश्चर्य वाटेल तर काही लोकांना त्यांच्या घरच्या कुत्र्याची आठवण येईल. काही लोकांना व्हिडीओ पाहून त्यांच्या कुत्र्यांवर सुद्धा असेच संस्कार करण्याची इच्छा होईल.
हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील प्रभू श्रीरामासाठी बनवलाय ११०० किलोचा दिवा, पाहा व्हायरल फोटो
mr.max_dog_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेये, “संस्कार”. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आतापर्यंतचा सर्वात अति सुंदर व्हिडीओ” तर एका युजरने लिहिलेय, “प्राण्यांना सुद्धा कळत आहे पण मोठी शोकांतिका माणसाला कधी कळणार” आणखी एका युजरने लिहिलेय, “हल्ली मुलांना असे संस्कार मिळत नाही आणि तुम्ही हे याला शिकवलेत. वाह नमस्कार तुम्हाला”